ठाणे : होळी, धुलिवंदन निमित्ताने सलग सुट्ट्या आल्याने अनेकजण गावी तसेच पर्यटनासाठी निघाले. यामुळे ठाणे शहरात मुख्य मार्ग आणि महामार्गावर वाहतुक कोंडी झाली होती. मुंबई नाशिक महामार्गावर साकेत पूल ते कॅडबरी जंक्शन आणि घोडबंदर येथील मानपाडा पर्यंत कोंडी झाली होती. या वाहतुक कोंडीमुळे कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. अवघ्या १० मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी चालकांना अर्धा तास लागत होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ठाण्यासाठी गणेश नाईक नको, नवी मुंबईतील नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

होळी आणि धुलिवंदन निमित्ताने अनेकजण गावी जात असतात. यावर्षी रविवारी होळी आणि सोमवारी धुलिवंदन असल्याने अनेकांनी शनिवारपासूनच गावी जाण्याची आखणी केली होती. तसेच ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेकजण पार्ट्या तसेच सुट्टीत मौज आणि पर्यटनासाठी जात असतात. त्यामुळे शनिवारी दुपारी मुंबई नाशिक महामार्ग आणि घोडबंदर मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबई नाशिक महामार्गावर रुंदीकरणाचे काम सुरू आहे. तर घोडबंदर मार्गावर मेट्रो चार मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरू आहे. या कामांमुळे रस्ते अरुंद झाले असून कोंडीत आणखी भर पडली. मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पूल ते घोडबंदर येथील मानपाडा पर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. अवघ्या १० मिनीटांच्या अंतरासाठी वाहन चालकांना सुमारे अर्धा तास लागत होता. दुपारी कामानिमित्ताने बाहेर पडलेल्या वाहन चालकांना या वाहतुक कोंडीत अडकावे लागले. बसगाड्या देखील या वाहतुक कोंडीत अडकून असल्याने प्रवाशांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane traffic jam on highway due to back to back holiday and holi css