ठाणे : घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या मार्गिकेसाठी तुळई (गर्डर) बसविण्याचे काम सुरू झाल्याने ठाणे वाहतुक शाखेने ३० मार्च पर्यंत वाहतुक बदल लागू केले आहेत. दररोज रात्री ११.५५ ते पहाटे ५ या वेळेत हे बदल लागू असतील. घोडबंदर मार्गावर वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. येथील मानपाडा, विजय गार्डन आणि कासारवडवली भागात गर्डर बसविण्यात येणार आहे. या कामासाठी वाहतुक बदल लागू केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : शहापूर : शासकीय आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग

घोडबंदर येथून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड-अवजड वाहनांना कासारवडवली आणि आनंदनगर भागात मुख्य वाहिनीवर प्रवेश बंदी असेल. येथील वाहने सेवा रस्ता मार्गे वाहतुक करतील. घोडबंदर येथून ठाण्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना विजय गार्डन सिग्नलजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने मुख्य रस्त्याने विरुद्ध दिशेने वाहतुक करून पुढे इच्छितस्थळी वाहतुक करतील. वाहतुक बदल ३० मार्चपर्यंत दररोज रात्री ११.५५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane traffic route changes at ghodbunder road for a month during midnight css