ठाणे : कल्याण फाटा येथील एमआयडीसी जलवाहिनी मार्गावर आज, मंगळवारपासून प्रायोगिक तत्त्वावर तीन दिवसीय वाहतुक बदल लागू केले जाणार आहेत. सायंकाळी ५.३० ते रात्री १० वाजेपर्यंत येथील वाहतुक एकेरी पद्धतीने सोडली जाणार आहे. त्यामुळे महापे रोड, शिळफाटा, कल्याणफाटा भागात वाहतुक कोंडीचा सामना वाहन चालकांना सहन करावा लागणार आहे. कल्याण, डोंबिवली भागातून अनेकजण कामानिमित्ताने नवी मुंबई भागात जात असतात. वाहन चालक कल्याणफाटा येथून महापे मार्गावर जाण्यासाठी एमआयडीसी जलवाहिनी मार्गाचा वापर करत असतात. या मार्गाच्या दोन्ही बाजूस जलवाहिनी आहेत. या जलवाहिन्या जीर्ण झाल्या असून त्याठिकाणी नव्याने जलवाहिनी टाकण्याचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) हाती घेतले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : ग्रंथाभिसरण वाचनालयाचा अमृत महोत्सवी सोहळा, अंबरनाथ येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बोगद्याचे खोदकाम, खांबाची उभारणी अशी कामेही या मार्गिकेलगत केली जाणार आहेत. या कामांमुळे एमआयडीसी मार्गिकेवरील रस्त्यावर कोंडी होण्याची शक्यता आहे. या कोंडीचा परिणाम काय होऊ शकतो, वाहतुक बदल कसे करता येतील याचा अभ्यास करण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी २८ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर वाहतुक बदल लागू केले आहेत. दररोज सायंकाळी ५.३० ते रात्री १० वाजेपर्यंत वाहतुक बदल लागू राहतील. या तीन दिवसांत वाहतुक एकेरी पद्धतीने सोडण्यात येणार आहे. त्यामुळे महापे, कल्याणफाटा आणि शिळफाटा मार्गावर वाहनांचा भार वाढून कोंडीची शक्यता वर्तविली जात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane traffic route changes at kalyanphata area from today css