ठाणे : बाळकूम येथे साईबाबा मंदिराचा वर्धापनदिन सोहळा साजरा केला जाणार आहे. या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी बदल लागू केले आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावर भार वाढून कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे. २ मे पर्यंत हे वाहतूक बदल लागू असतील.
बाळकूम परिसरात साईबाबा मंदिर आहे. या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा मंगळवारपासून साजरा केला जात आहे. २ मेपर्यंत हा वर्धापनदिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे या मार्गाजवळ मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते. ही कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी बदल लागू केले आहेत. साकेत येथून बाळकूम मार्गे कशेळीकडे जाणाऱ्या वाहनांना लोढा गृहसंकुलाजवळ प्रवेशबंदी असेल. येथील वाहने माजिवडा मार्गे वाहतूक करतील.
हेही वाचा : समुद्रालगतच्या १०० फूट उंच सुया सुळक्यावरून राज्याला मानवंदना
कशेळी येथून बाळकूममार्गे साकेतच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना बाळकूम नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कापूरबावडी चौकातून वाहतूक करतील. या वाहतूक बदलामुळे कापूरबावडी, माजिवडा भागात कोंडी होण्याची शक्यता आहे.