ठाणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा भिवंडीत होणार आहे. या यात्रेनिमित्ताने भिवंडी शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यावर वाहतूक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्ग तसेच पर्यायी मार्गावर कोंडीची शक्यता वर्तविली जात आहे. हे वाहतूक बदल शुक्रवारी दुपारी १२ ते सायंकाळी ७ पर्यंत कायम असतील. ठाणे, मुंबई येथून जुना आग्रा रोडने भिवंडी शहराच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना अंजुरफाटा येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने वसई रोड मार्गे गुजरातच्या दिशेने वाहतूक करतील. मुंबई, ठाणे येथून आग्रा रोडने अंजुरफाटा, भिवंडी शहरात वाहतूक करणाऱ्या टीएमटी, एसटी बसगाड्या आणि हलक्या वाहनांना नारपोली पोलीस ठाण्याजवळ प्रवेशबंदी असेल. बसगाड्यांमधील प्रवाशांना नारपोली पोलीस ठाण्याजवळ उतरविले जाईल. तर हलकी वाहने देवजीनगर किंवा साईनाथ सोसायटी, कामतघर येथून वाहतूक करतील. रांजनोली नाका येथून भिवंडी शहराच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना रांजनोली येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने मुंबई नाशिक महामार्गाने मानकोली नाका, अंजुरफाटा किंवा वसई रोड किंवा ओवळी खिंड, ताडाळी, जकातनाका, जलवाहिनी मार्गे वाहतूक करतील. एसटी बसगाड्यांची वाहतूक रांजनोली येथे थांबवून प्रवाशांना तेथे बसगाडी मधून उतरविले जाईल.

हेही वाचा : ठाणे : ‘टीएमटी’त सवलतीचे तिकीट देतांना वाहकांची तारांबळ

Engravings on the wheels
चित्रास कारण की: जमिनीवरची मेंदी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
Municipal Commissioner Bhushan Gagrani warns Law Department not to delay in court cases
न्यायालयीन प्रकरणांत दिरंगाई नको, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांचा विधि विभागाला इशारा

वाडा, नदीनाका मार्गे भिवंडी शहराच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना पारोळफाटा येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने अंबाडी नाका, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ किंवा मुंबई महापालिका जलवाहिनी मार्गाने वाहतूक करतील. तर हलकी वाहने पारोळ रोड, मीठपाडा, खोणीगाव मार्गे वाहतूक करतील. वडपा मार्गे भिवंडी शहराच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना धामणगाव जांबोळी जलवाहिनी नाका मार्गे आणि चाविंद्रा नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने धामणगाव येथून उजवे वळण घेऊन जलवाहिनी मार्गे, वाडा येथून वाहतूक करतील. तर बसगाडीमधील प्रवाशांना चाविंद्रा जकात नाका येथे उतरविले जाईल. छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून वंजारपट्टी नाका मार्गे प्रवास करणाऱ्या वाहनांना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने टिळक चौक, केशरबाग नाका, धामणकर नाका वरून इच्छितस्थळी वाहतूक करतील. तर नदीनाका, वंजारपट्टी नाका, आनंद दिघे चौक, कल्याण नाका, आसबीबी मशीद, नवी वस्ती परिसरात रस्त्याकडेला वाहने उभी करण्यास मनाई असेल.