ठाणे : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा भिवंडीत होणार आहे. या यात्रेनिमित्ताने भिवंडी शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यावर वाहतूक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्ग तसेच पर्यायी मार्गावर कोंडीची शक्यता वर्तविली जात आहे. हे वाहतूक बदल शुक्रवारी दुपारी १२ ते सायंकाळी ७ पर्यंत कायम असतील. ठाणे, मुंबई येथून जुना आग्रा रोडने भिवंडी शहराच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना अंजुरफाटा येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने वसई रोड मार्गे गुजरातच्या दिशेने वाहतूक करतील. मुंबई, ठाणे येथून आग्रा रोडने अंजुरफाटा, भिवंडी शहरात वाहतूक करणाऱ्या टीएमटी, एसटी बसगाड्या आणि हलक्या वाहनांना नारपोली पोलीस ठाण्याजवळ प्रवेशबंदी असेल. बसगाड्यांमधील प्रवाशांना नारपोली पोलीस ठाण्याजवळ उतरविले जाईल. तर हलकी वाहने देवजीनगर किंवा साईनाथ सोसायटी, कामतघर येथून वाहतूक करतील. रांजनोली नाका येथून भिवंडी शहराच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना रांजनोली येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने मुंबई नाशिक महामार्गाने मानकोली नाका, अंजुरफाटा किंवा वसई रोड किंवा ओवळी खिंड, ताडाळी, जकातनाका, जलवाहिनी मार्गे वाहतूक करतील. एसटी बसगाड्यांची वाहतूक रांजनोली येथे थांबवून प्रवाशांना तेथे बसगाडी मधून उतरविले जाईल.
राहुल गांधी यांच्या यात्रे निमित्ताने भिवंडीत मोठे वाहतूक बदल
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा भिवंडीत होणार आहे. या यात्रेनिमित्ताने भिवंडी शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यावर वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
Written by लोकसत्ता टीम
ठाणे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-03-2024 at 12:16 IST
TOPICSठाणेThaneठाणे न्यूजThane NewsपोलीसPoliceमराठी बातम्याMarathi Newsराहुल गांधीRahul Gandhi
+ 1 More
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane traffic route changes in bhiwandi for rahul gandhi bharat jodo nyay yatra css