ठाणे : उल्हासनगरमधील हिललाईन पोलिस ठाण्यामध्ये शुक्रवारी रात्री भाजपचे कल्याण पुर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. तर, राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर असून डाॅक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, असेही रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनामध्ये शुक्रवारी रात्री आमदार गणपत गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड हे दोघे बसले होते. त्यावेळी आमदार गायकवाड आणि शहरप्रमुख महेश यांच्यात बोलाचाली झाली. यावरून संतप्त झालेल्या आमदार गायकवाड यांनी महेश यांच्यावर गोळीबार केला. यात महेश आणि त्यांचा सहकाही राहुल पाटील हे दोघे जखमी झाले. या दोघांना ठाण्याच्या ज्युपीटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ज्युपिटर रुग्णालय प्रशासनाने मेडिकल बुलेटिन काढून दोघांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट दिली आहे.

हेही वाचा : उल्हासनगरमध्ये भाजप आमदाराकडून शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार

महेश गायकवाड यांना २ फेबु्रवारी रोजी रात्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर गोळीबाराच्या अनेक जखमा होत्या. त्यांच्यावर रात्री शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलेले असून ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची तज्ज्ञ टीम त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याचबरोबर राहुल पाटील हे सुद्धा बंदुकीच्या गोळीने जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना सध्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक त्याच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे रुग्णालय प्रशासनाने मेडिकल बुलेटीनमध्ये म्हटले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane ulhasnagar firing case injured shivsena s mahesh gaikwad is in critical condition css
Show comments