उल्हासनगर : महापालिकेची परिवहन विभागाची पहिली बस येत्या दिवाळीत धावण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या परिवहन सेवेची प्रतीक्षा होती. नुकतीच उल्हासनगर महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत चाचणीसाठी आलेल्या पहिल्या बसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पालिकेने निश्चित केलेल्या मार्गांवर या बसची चाचणी होणार आहे. तर दहा बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार असून या बसगाड्यांची प्रवासी सुविधा दिवाळीत सुरू होण्याची शक्यता आहे.

व्यापारी शहर म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगर शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नावाखाली केवळ खासगी रिक्षांचा पर्याय आहे. दररोज हजारो ग्राहक, विक्रेते उल्हासनगर शहरात येत असतात. तर आसपासच्या शहरातूनही नागरिक उल्हासनगर शहरात ये-जा करत असतात. त्यामुळे येथे उल्हासनगर महापालिकेची परिवहन सेवा असावी अशी मागणी होती. काही वर्षांपूर्वी उल्हासनगर पालिकेने परिवहन सेवा सुरू केली होती. मात्र काही काळानंतर ती ठप्प झाली. त्यानंतर गेल्या काही वर्षांपासून शहरात पुन्हा परिवहन सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. गेल्या वर्षात पालिकेने पर्यावरणपूरक प्रवासासाठी २० इलेक्ट्रीक बस खरेदीचा निर्णय घेतला. त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या. पुण्याजवळील भोसरी औद्योगिक वसाहतीत या बसच्या बांधणीसाठी कंपनीला काम देण्यात आले.

London–Calcutta bus service
London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
mega block on central and western line for repair of railway tracks and signals system
Mumbai Local Train Update: रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच

हेही वाचा : डोंबिवलीजवळील खोणी गावात २१ लाखाची वीज चोरी

यातील १० बसच्या बांधणीचे काम नुकतेच पूर्ण झाले. त्यानंतर नुकतीच यातील एक बस उल्हासनगर शहरात दाखल झाली आहे. गुरूवारी उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या उपस्थितीत या बसची चाचणी सुरू करण्यात आली. येत्या काही दिवसात शहरात पालिका प्रशासनाने निश्चित केलेल्या मार्गांवर बसची चाचणी घेतली जाणार आहे. शहरात शहाड परिसरात या बससाठी डेपोची व्यवस्था करण्यात आली आहे. तर इलेक्ट्रीक वाहनांसाठी आवश्यक चार्जिंग स्थानकही उभारण्यात आले आहेत. परिवहन सेवेतील चालकांना प्रशिक्षण दिले जाते आहे. त्यांचीही लवकरच नेमणूक केली जाईल अशी माहिती उल्हासनगर महापालिका प्रशासनाने दिली आहे. दिवाळीत ही बससेवा सुरू करण्याचा उल्हासनगर महापालिकेचा मानस आहे. ही परिवहन सेवा सुरू झाल्यास त्याचा प्रवाशांना फायदा होणार आहे.

हेही वाचा : डोंबिवलीत अभिनव बँकेच्या एटीएममधून भामट्यांनी २५ लाख लुटले

उल्हासनगरसह, अंबरनाथ बदलापुरातील प्रवाशांना फायदा

उल्हासनगर शहरासह आसपासच्या शहरांमध्ये या परिवहन सेवेचे मार्ग प्रस्तावित आहेत. या परिवहन सेवेच्या पहिल्या टप्प्यात शहरातच सेवा असणार असली तरी आसपासच्या शहरांतील प्रवाशांनाही त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना कमी खर्चात प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण ?

उल्हासनगरच्या परिवहन सेवेचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी पालिकेसह स्थानिक लोकप्रतिनिधीही प्रयत्नशील आहेत. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी महत्वाकांक्षी असलेला शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प आणि संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचेही भूमीपुजन यावेळी केले जाण्याची शक्यता आहे.