कल्याण : कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई हद्दीत मोटार सायकलच्या चोऱ्या करणाऱ्या दोन चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी उल्हासनगर येथून अटक केली आहे. या चोरट्यांनी चार गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांनी इतर शहरांमध्ये अशाप्रकारच्या चोऱ्या केल्या आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.

ऋतिक बाविस्कर (१९), कुणाल नायडु (१९) अशी पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी या दोन चोरट्यांनी चोरी केलेल्या दोन लाख ७० हजार रूपये किमतीच्या चार मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत. डोंबिवली, कल्याण परिसरात मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या वेळेत घरासमोर, सार्वजनिक रस्त्यावर ठेवलेली दुचाकी चोरून नेण्याचे प्रमाण वाढले होते. या वाढत्या तक्रारींमुळे पोलीस त्रस्त होते.

Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Badlapur Crime News
Badlapur Crime : पत्नीवर बलात्कार करणाऱ्या मित्राची पतीने डोक्यात हातोडी घालून केली हत्या, बदलापूरमधली घटना
kalyan mcoca act news in marathi
कल्याणमधील माजी भाजप नगरसेवकासह पाच जणांची मोक्का आरोपातून मुक्तता, व्यापाऱ्यावर हल्ला केल्याचा झाला होता आरोप
Maharashtra News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News LIVE Updates : खंडणी प्रकरणात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे; वाल्मिक कराडच्या वकिलांची माहिती
Crime News
Crime News : हत्या करावी की नाही? हे टॉस करून ठरवलं; १८ वर्षीय तरूणीच्या मृतदेहावर बलात्कार करणाऱ्या नराधमाची कोर्टात धक्कादायक कबुली
Solapur mayor Mahesh kothe death marathi news
Mahesh Kothe : कुंभमेळ्यात स्नान करताना सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचा हृदयविकाराने मृत्यू
Live-In Registration Mandatory UCC Rules in Marathi
Live-In Registration Mandatory : लिव्ह-इन जोडप्यांनाही लग्नाप्रमाणे नोंदणी करावी लागणार! ‘आधार’ अनिवार्य, २६ जानेवारीपासून UCC चे नवे नियम लागू होण्याची शक्यता

हेही वाचा : कल्याणमधील माजी भाजप नगरसेवकासह पाच जणांची मोक्का आरोपातून मुक्तता, व्यापाऱ्यावर हल्ला केल्याचा झाला होता आरोप

पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी या मोटार सायकल चोरांचा छडा लावण्याचे आदेश मानपाडा पोलिसांना दिले होते. यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते. साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे विशेष पथक काही दिवसांपासून मोटार सायकल चोरट्यांचा शोध घेत होते. मोटार सायकल चोरी झालेल्या घटनास्थळाचे सीसीटीव्ही चित्रण तपासून पोलिसांच्या दोन तरूण हे प्रकार करत असल्याचे निदर्शनास आले होते.

हेही वाचा : ठाण्यातील नागरिकांना घडणार सिंधु संस्कृतीचे दर्शन, जोशी-बेडेकर महाविद्यालयात साकारले सिंधु संकृतीचे प्रदर्शन

पोलिसांनी या तरूणांची ओळख पटवली. हे तरूण उल्हासनगर येथील असल्याची खात्री पोलिसांना पटली. सापळा लावून पोलिसांनी त्यांना उल्हासनगर येथून अटक केली. पोलीस निरीक्षक राम चोपडे, जयपालसिंह गिरासे, दत्तात्रय गुंड, साहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ, महेश राळेभात, हवालदार सुनील पवार, संजु मासाळ, विकास माळी, शिरीष पाटील, नाना चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Story img Loader