ठाणे : माझ्या आयुष्यात पोस्टर लावायला एक रुपयाही खर्च करत नाही आणि करणार नाही. माझ्या स्वागताला कुत्राही नसतो. पण सध्या ‘झेड प्लस’ सुरक्षा असल्याने कुत्रा यायाला लागला, पण आताच्या राजकीय पदाधिकाऱ्याला तात्कालीक पद मिळाले तरी ‘साला मै तो साहब बन गया’ असे म्हणत फलकबाजी सुरू होते असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
ठाण्यातील डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सोमवारी (३१ मार्च) ब्रम्हाळा ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने सुप्रसिद्ध निवेदक, सुत्रसंचालक, मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्ताने अमृत गौरव सत्कार सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डाॅ. अनिल काकोडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, माझा अपघात झाला होता. तेव्हा दिवंगत रतन टाटा मला भेटण्यासाठी येणार होते. परंतु त्यांना माझ्या निवासस्थानाचा पत्ता मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी मला संपर्क साधला. मी म्हणालो तुमच्या चालकाला मोबाईल द्या. तर ते म्हणाले. मीच वाहन चालवित आहे. इतके मोठे लोक किती साधे होते असेही गडकरी म्हणाले.
माझ्या आयुष्यात पोस्टर लावायला एक रुपयाही खर्च करत नाही आणि करणार नाही. माझ्या स्वागताला कुत्राही नसतो. पण सध्या ‘झेड प्लस’ सुरक्षा असल्याने कुत्रा यायाला लागला, पण आताच्या राजकीय पदाधिकाऱ्याल छोटे तात्काली पद मिळाले तर ‘साला मै तो साहब बन गया’ असा टोलाही त्यांनी लगावला.
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळ राहण्यामुळे मला त्यांच्या स्वभावाचे अनेक कंगोरे जवळून पाहण्यास मिळाले. परंतु सुधीर गाडगीळ यांनी त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या अंतरंगात जाऊन त्यांची मुलाखत घेतली. सुधीर गाडगीळ सखोल अभ्यास, संशोधन करून मुलाखती घेतल्या. त्यांच्या मुलाखतीमधून मनोरंजन नाही तर प्रबोधन होते असेही ते म्हणाले.
आपली मराठी भाषा खूप समृद्ध आणि संपन्न आहे. मराठी माणसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कला आहेत. त्याचे महत्त्व महाराष्ट्रात राहून कधीच लक्षात येत नाही. परंतु मराठी माणूस राज्याबाहेरील कानाकोपऱ्यात किंवा जगात जातो. तेव्हा लक्षात येते आपले वेगळेपण कशात आहे. महाराष्ट्र आणि बंगालमध्ये साहित्य, संस्कृती, कला याचे वेगळे स्वरूप आहे असेही गडकरी म्हणाले.