ठाणे : अनंत चतुर्दशीच्या दिवशी भिवंडीमध्ये दोन गटांमध्ये वाद झाला होता. यावेळी दगडफेक आणि लाठीमार झाला होता. तसेच हिंदूत्त्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे मागे घ्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि साधूंनी दिली.

भिवंडी शहरात गणेश विसर्जन मिरवणूकी दरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर दोन गटात वाद झाले होते. पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी लाठीमार केला होता. या घनटेनंतर आयपीएस अधिकारी डाॅ. श्रीकांत परोपकारी यांची बदली देखील झाली. या प्रकरणात विविध पोलीस ठाण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. बुधवारी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि साधूंनी ठाण्यातील शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेतली.

हेही वाचा : कडोंमपाच्या नाममुद्रेचा दिपेश म्हात्रेंनी गैरवापर केल्याची भाजपची आयुक्त डॉ. जाखड यांच्याकडे तक्रार; कायदेशीर कारवाईची मागणी

हिंदु समाजाच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम आटोपता घेण्यासाठी पोलीस आग्रही होते. त्याच सुमारास दगडफेकीचा प्रकार घडले. तर पोलीस प्रशासन म्हणते लहान मुलांनी दगड मारले. मग यामागे कोण आहे ? आठ दिवसांत १८ ते २२ जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या, अन्यथा भारतभरातील साधुसंत, विविध आखाड्याचे महंत, वारकरी संप्रदाय, ५०० नागा साधुसह लाखो हिंदुत्ववादी कार्यकर्ते भिवंडीत येऊन आंदोलन छेडतील. सरकार व भिवंडीतील प्रशासनाने याची दखल घ्यावी असा इशारा त्यांनी दिला. भिवंडीतील विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने ठाणे पोलिसांना निवेदन देण्यात आले.