ठाणे : एक्स्प्रेस रेल्वेगाडीमध्ये महिलेचे मोबाईलवर छायाचित्र काढून तिचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. नवी मुंबईमध्ये राहणारी पिडीत महिला रविवारी अमरावतीला जाण्यासाठी ठाणे स्थानकात आल्या होत्या. रेल्वेगाडीत प्रवास करत असताना एका व्यक्तीने त्यांचे मोबाईलवर छायाचित्र काढले.
हेही वाचा : डोंबिवलीत रविवारी तिरुपती बालाजी महोत्सव; तिरुमाला देवस्थान, डाॅक्टर श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे संयोजन
पिडीत महिला अमरावती येथे पोहचल्यानंतर तीने याप्रकरणी तेथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हा प्रकार ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.