ठाणे : भ्रष्टाचार करणारे नाही तर हिंदू मुस्लिम दंगल घडविणारे खरे देशद्रोही असतात. देशाची सत्ता चालविण्यासाठी सत्ताधाऱ्यांना हिंदू मुस्लिम वादासारखी कारणे शोधावी लागत आहेत. त्यामुळे या देशात भाजप हा एक देशद्रोही पक्ष असल्याचं वक्तव्य योगेंद्र यादव यांनी बुधवारी ठाण्यात केले.

भारत जोडो अभियान, ठाणे यांच्या वतीने लोकशाही संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. हे संमेलन लोकशाही, संविधान आणि मताधिकार या विषयावर पार पडले. या संमेलनात शाहीर संभाजी भगत यांनी संविधान तसेच सध्याच्या राजकीय घडामोडीवर गाण्याच्या माध्यमातून भाष्य केलं. त्यासह, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव, भारत जोडो यात्रेच्या महाराष्ट्राच्या संयोजिका उल्का महाजन आणि डॉ संजय मंगला गोपाळ यांनी संमेलनाला संबोधित केले.

Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Chhagan Bhujbal plea dispute with BJP for release from ED Mumbai print news
भुजबळ यांच्या दाव्याने नवे वादळ; ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर; ओबीसी असल्याने कारवाई’
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Amit shah on Sharad pawar and Devendra Fadnavis
Amit Shah: “आपल्याला देवेंद्र फडणवीसांना पुन्हा…”, अमित शाहांचे शिराळ्याच्या सभेत मोठे विधान; राजकीय चर्चांना उधाण
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?

हेही वाचा : कल्याण पूर्वेतील बंडखोर शहरप्रमुख महेश गायकवाड; यांच्यासह नऊ जणांची शिवसेनेतून हकालपट्टी

यावेळी बोलताना योगेंद्र यादव म्हणाले, महाराष्ट्रात तीन पक्ष मिळून उभं राहिलेलं सरकार आहे. हे केवळ भाजप आणि त्याचे दोन एक्स्टेंशन आहे. दहा वर्षा पूर्वीच महाराष्ट्राचं राजकारण हे एक इतर राज्यांसमोरच मॉडेल होत. इतर राज्यातील नेते हे केवळ उद्या पुरत बोलायचे पण महाराष्ट्रातील नेते पुढील दहा ते पंधरा वर्षाचं बोलायचे त्यामुळे या राज्याचे राजकारण माझ्यासाठी एक प्रकारचं मॉडेल होत. परंतु, गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राचे राजकारण खूप बदलले आहे. उद्धव ठाकरेंची ज्याप्रकारे सत्ता बरखास्त केली आणि फसवणूक जे सरकार उभे केले. ते सरकार म्हणजे लूटमारीचे आणि फुटीचे सरकार आहे, असे मत योगेंद्र यादव यांनी मांडले. मागील एका भाषणात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः एनसीपी म्हणजे नेचरली करप्ट पार्टी असा उल्लेख करत अजित पवार यांचा उल्लेख केला होता. परंतु, आज त्याच अजित पवार सोबत महाराष्ट्रात भाजप सत्तेत आहे, अशी टीका ही यादव यांनी केली.

Story img Loader