ठाणे : माजिवडा नाका येथे गुरुवारी सायंकाळी टेम्पोच्या धडकेत ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मितेश नागडा असे मृताचे नाव असून याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील धोबी आळी परिसरात मितेश नागडा हे त्यांचे ७० वर्षीय वडिल, आई आणि पत्नीसोबत वास्तव्यास होते. त्यांचा ठाणे बाजारपेठेत मसाला विक्रीचा व्यवसाय आहे. गुरुवारी सायंकाळी मितेश हे त्यांच्या दुचाकीने ठाण्याच्या दिशेने वाहतूक करत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पवारांच्या कोंडीसाठी मुंबई बाजारसमिती लक्ष्य?

ते माजिवडा नाका येथे आले असता, मागून येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून ते खाली पडले. त्याचवेळी, टेम्पोचे मागील चाक त्यांच्या अंगावरून गेले. या घटनेत त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला होता. मितेश यांच्या वडिलांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In thane youth died in two wheeler and tempo accident css