ठाणे : भिवंडी येथील काल्हेर भागात रासायनिक गोदामांना आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. ही आग इतकी भीषण होती की, गोदामांमध्ये अनेक स्फोट झाले. सायंकाळी उशीरापर्यंत ठाणे आणि भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य सुरू होते.
काल्हेर येथील देशमुख वेअर हाऊस परिसरात रासायनिक गोदामे आहेत. शुक्रवारी दुपारी ३.४० वाजता अचानक येथील गोदामांना आग लागली. घटनेची माहिती मिळाल्यानंंतर ठाणे आणि भिवंडी महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी उशीरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य पथकाकडून सुरू होते. आगीत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाने दिली.