उरण : पावसाळ्यात उगवलेल्या  गवत कापून न काढता त्याला भरदिवसा आगी लावण्यात येत  आहेत.त्यामुळे लाखो रुपये खर्चून लागवड करण्यात आलेली झाडे आणि सरपटणारे प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत.  याकडे दुर्लक्ष होत असल्याने उरणच्या प्रदूषणात ही वाढ होऊ लागली आहे.  या घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी  नागरिकांकडून करण्यात येत आहे.

उरण परिसराचा विकास सिडकोच्या माध्यमातून करण्यात येत आहे.त्यामुळे या परिसराचा कायापालट आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या ठिकाणा वरील गवताची छाटणी, विविध प्रकारच्या झाडांचे संवर्धन,जतन करण्यासाठी सिडको कडून लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत.परंतु गवत छाटणीचा ठेका घेणारे ठेकेदार हे सिडकोच्या अधिकारी वर्गाच्या डोळ्यात दरवर्षी धुळ फेक करत सिडकोच्या भूखंडावरील गवताची छाटणी न करता त्या गवताळा आग लावण्याचे काम करत आहेत.त्यामुळे या परिसरातील झाडे भक्ष्यस्थानी पडून प्रदुषणात वाढ होत आहे.

हेही वाचा >>>अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, तुळजाभवानीला साकडे; नेरुळ ते तुळजापूर पदयात्रा

तरी सिडकोच्या द्रोणागिरी नोड परिसरातील भूखंडा वरील गवताची छाटणी न करता संबंधित ठेकेदार हे आगी लावीत आहेत. त्यामुळे सिडकोचे लाखो रुपये वाया जात आहेत. हडप करण्याचा प्रयत्न करत असतील तर सिडकोने वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांची चौकशी करावी अशी मागणी मनसेचे उरण तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी सिडको कडे केली आहे.

Story img Loader