ठाणे : शहरात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून आटोक्यात असलेल्या करोनाचा संसर्ग गेल्या सात दिवसांपासून वाढू लागला आहे. शहरामध्ये महिनाभरात जेमतेम ४० ते ४५ रुग्ण आढळून येत होते. पण, गेल्या सात दिवसात ५१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात एका दहा वर्षीय बालकाचा समावेश असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चाचण्यांची संख्या वाढविण्यात आलेली नसतानाही रुग्ण संख्येत वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ सुरू झाली आहे.ठाणे जिल्ह्यात यंदाच्या फेब्रुवारी महिनाअखेरपर्यंत करोनाचा संसर्ग आटोक्यात होता. मार्च महिना सुरु होताच जिल्ह्यात करोनाचा संसर्ग अचानकपणे वाढला होता. ठाणे जिल्ह्यात दररोज शंभरहून अधिक रुग्ण आढळून येत होते. त्यात ठाणे शहरात सर्वाधिक रुग्ण आढळून येत होते. शहरात रुग्ण मृत्युचे प्रमाणही वाढले होते. पालिका तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणांकडून करोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परिणामी, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून करोनाचा कमी होऊ लागला होता. ठाणे शहरात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून करोनाचा आटोक्यात असल्याचे चित्र होते. शहरात दररोज ३५० च्या आसपास करोना चाचण्या केल्या जात आहेत. शहरामध्ये महिनाभरात जेमतेम ४० ते ४५ रुग्ण आढळून येत होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. गेल्या सात दिवसात ५१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी चार रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. त्यातील तीन रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तर, एका दहा वर्षीय बालकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित रुग्ण घरीच उपचार घेत आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली. करोनाचा संसर्ग वाढण्यामागचे कारण मात्र समजू शकलेले नाही.