लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे – जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारित कार्यक्रमामध्ये १ लाख २९ हजार ३७२ मतदारांची वाढ झाली आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यात सद्यस्थितीत मतदारांची संख्या ६३ लाख ४३ हजार ८८९ इतकी झाली आहे. तर १३३ मतदान केंद्रही नव्याने तयार करण्यात आले आहेत.

Mega Housing Lottery application process, entension, CIDCO
सिडकोच्या २६ हजारांच्या महागृहनिर्माण सोडत प्रक्रियेला महिन्याभराची मुदतवाढ
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
Some people in district promoted their own brothers sisters and daughters ajit pawar
नंदुरबार जिल्ह्यात काही जणांकडून भावकीचीच प्रगती, अजित पवार यांचा डॉ. विजयकुमार गावित यांना टोला
army recruitment, Deolali camp, nashik district
सैन्य भरतीसाठी देवळाली कॅम्प येथे एकाच दिवसात १२ हजार तरुण उपस्थित
house lottery application, deadline, Navi Mumbai,
घरे सोडत अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढीची मागणी, आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी दिलेली मुदत अपुरी असल्याचे अनेकांचे मत
Job Opportunity Recruitment of Scientist B Posts
नोकरीची संधी: ‘सायंटिस्ट-बी’ पदांची भरती
In last 20 days 73 611 new voters registered in thane district ahead of assembly elections
जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत वाढ, २० दिवसांत ७३ हजार मतदारांची भर

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर सर्वत्र मतदार याद्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारित कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमादरम्यान ५ जानेवारी ते २७ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ठाणे जिल्ह्यात १ लाख २९ हजार ३७२ मतदारांची वाढ झाली आहे. यानुसार ठाणे जिल्ह्यात सद्यस्थितीत मतदारांची संख्या ६३ लाख ४३ हजार ८८९ इतकी झाली आहे. तर १३३ मतदान केंद्रही नव्याने तयार करण्यात आले आहेत.

आणखी वाचा-डोंबिवलीत नांदिवली टेकडी येथे मोटारीच्या धडकेत महिला ठार

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात ५ जानेवारी ते २७ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमा अंतर्गत नवीन मतदारांची नोंदणी करणे, छायाचित्र नसलेल्या मतदारांचे नाव यादीतून वगळणे किंवा त्यांचे छायाचित्र जोडून घेणे, स्थलांतरित आणि मृत मतदारांची नावे यादीतून वगळणे यांसारखी कामे करण्यात आली. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे घरोघरी भेटी देवून मतदारांच्या पडताळणी दरम्यान ठाणे जिल्ह्यातील अंदाजे १५ लाख १६ हजार ८५३ इतक्या घरांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. या भेटीदरम्यान एकूण मयत मतदार ४७ हजार ७०९ व एकूण कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार ४७ हजार ९३३ असल्याचे आढळून आलेले आहेत. या मतदारांना यादीतून वगळण्यात आले आहे. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर १८-१९ वयोगटातील नव मतदारांची नोंदणी, लक्षित घटकांची आणि महिला मतदारांची नोंदणी विशेष करून भिवंडी व ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये व इतर सर्व मतदारसंघामध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.आगामी लोकसभा निवडणुकीआधी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवून जास्तीत जास्त पात्र मतदारांची नोंदणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे व उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

आणखी वाचा-कल्याणमध्ये पत्नीला गळफास देऊन ठार मारण्याचा प्रयत्न, फरार पतीचा पोलिसांकडून शोध

५ जानेवारी ते २७ ऑक्टोबर, २०२३ दरम्यान एकूण १ लाख २९ हजार ३७२ इतक्या मतदारांची वाढ झालेली आहे. यामध्ये पुरूष – ६५ हजार ६७२, स्त्री – ६३ हजार ६८१ व इतर १९ इतकी वाढ झाली आहे. यानुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात पुरूष – ३४ लाख ३२ हजार ७९२, स्त्री- २९ लाख १० हजार, इतर- १ हजार ९७ अशी एकूण मतदारांची संख्या ६३ लाख ४३ हजार ८८९ इतकी झाली आहे. तसेच दिव्यांग मतदार नोंदणी मध्ये एकूण – १ हजार २०६ इतकी वाढ झालेली आहे. या नुसार जिल्ह्यात एकूण ३३ हजार ३३८ इतके दिव्यांग मतदार आहेत. तर १२ हजार ५७२ देह विक्रय करणाऱ्या महिला मतदारांची ही मतदार नोंदणी करण्यात आलेली आहे. तसेच ४ हजार ३३१ इतक्या असंरक्षित आदिवासी गटातील मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यातील महिलांचे प्रमाण यामध्ये एकूण ३ ने वाढ झालेली आहे. ५ जानेवारी, २०२३ रोजी महिलांचे प्रमाण ८४५ होते तर सध्या हे प्रमाण ८४८ इतके आहे.

जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात मतदार नोंदणीचे गुणोत्तर ६५.४०% इतके झाले आहे. जिल्ह्यातील १८-१९ वयोगटातील मतदारांमध्ये एकूण २९ हजार १२४ इतकी वाढ झालेली असून या वयोगटातील एकूण मतदार ७५ हजार २२३ इतके झाले आहेत.