ठाणे : सीएनजी इंधनात झालेली दरवाढ आणि त्याचबरोबर गेल्या काही महिन्यात वाढलेली महागाई या सर्वाच्या पार्श्वभूमीवर रिक्षा प्रवासी भाडे दरात चार रुपयांनी वाढ करण्याची मागणी ठाणे ऑटो रिक्षा मेन्स युनियनने राज्य शासनाकडे केली आहे. पुणे शहरात रिक्षा भाड्यात चार रुपयांची वाढ करण्यात आली असून त्याच धर्तीवर महागाईच्या काळात ठाणेसह महाराष्ट्रातील इतर रिक्षा चालक मालकांना दिलासा द्यावा, असे युनियनने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा <<<Maharashtra News Live : दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट

हेही वाचा <<<डोंबिवलीत देवीचापाडा येथे गणपती विसर्जनासाठी खारफुटीची तोड; पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजी

राज्याच्या परिवहन विभागाने एक ते दीड वर्षांपूर्वी रिक्षाचे भाडे दरात तीन रुपयांनी वाढ केली. यामुळे रिक्षाचे भाडे १८ रुपयांवरून २१ रुपये इतके झाले होते. परंतु करोना काळानंतर प्रचंड महागाई वाढली आहे. रिक्षासाठी लागणाऱ्या सीएनजी इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्यात सुमारे ६० टक्के दरवाढ झाली आहे. त्याचबरोबर रिक्षासाठी लागणारे तेल आणि  स्पेअर पार्टच्या दरात वाढ झाली आहे. जीवनावश्यक वस्तू आणि बँक कर्जाच्या व्याजाच्या दरात तसेच विमा शुल्कातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु वाढत्या महागाईच्या तुलनेत रिक्षा भाड्यात कोणतेही वाढ झालेली असून त्यामुळे त्यांना कुटुंबाचा चरितार्थ चालविणे अत्यंत कठीण झाले आहे, असे ठाणे ऑटोरिक्षामेन्स युनियनचे सरचिटणीस चेतन आंबोणकर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा <<<एसी लोकलचा विषय पुन्हा पेटणार? वातानुकूलित लोकल सुरु करण्याबाबत बदलापूर स्थानकात सूचना फलक

गेल्या काही वर्षात ठाण्यासह महाराष्ट्रातील शहरांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. शहरांच्या अंतर्गत भागात सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसाठी रिक्षा हा अविभाज्य घटक आहे. नुकतेच पुणे शहरात रिक्षा भाडे दरात चार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महागाईच्या काळात ठाणेसह महाराष्ट्रातील इतर रिक्षा चालक मालकांना दिलासा द्यावा. सीएनजी तसेच वाहन तेलाच्या दरात झालेली वाढ, रिक्षा जीवनमान देखभाल खर्च दुरुस्ती विमा कराच्या दरात झालेली वाढ, सतत वाढत असलेली महागाई आणि प्रत्येक गोष्टींवर लावण्यात येणारा जीएसटी या सर्वाचा विचार करून रिक्षा भाडे दरात ४ रुपयांनी वाढ करावी आणि पुढील टप्प्याच्या भाड्यात सन्माननीय वाढ करावी, अशी मागणी कामगार नेते रवी राव यांनी राज्य शासनाकडे केली असल्याचे आंबोणकर यांनी म्हटले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase rickshaw passenger fare four rupees demand thane auto rickshaw men union state govt ysh
Show comments