डोंबिवलीत गेल्या काही महिन्यांपासून औषध विक्री दुकानांमधील चोऱ्या वाढल्या आहेत. या चोरीत दुकानातील औषधाची नासाडी, भिंती, प्रवेशद्वार यांची तोडफोड केल्याने आर्थिक नुकसान होत आहे. गेल्या काही महिन्यात चोरट्यांनी एकूण सात दुकाने डोंबिवली परिसरात फोडली आहेत.यासंदर्भात डोंबिवली औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दिलीप देशमुख, नीलेश वाणी, दधुनाथ यादव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची भेट घेतली. औषध दुकानातील वाढत्या चोऱ्यांमुळे औषध दुकाने असलेल्या भागातील रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली. तसेच चोरट्यांना पकडण्यासाठी एक विशेष तपास पथक स्थापन करावे. औषध दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरट्यांची छबी कैद झाली आहे. औषध दुकानांमध्ये एक नोंदणी पुस्तक ठेऊन तेथे पोलिसांनी भेट दिल्याची नोंद आणि परिसरात पोलीस फिरत असल्याची माहिती पाळतीवर असलेल्या चोरट्यांना कळेल, अशी मागणी औषध विक्रेत्यांनी केली.

हेही वाचा >>>ठाणे: तरुणांचे आयुष्य उध्वस्त करण्याच्या दिशेने राज्यकर्त्यांचा कारभार; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची राज्य सरकारवर टीका

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
karnataka goverment bans tobbacco products using offices staff
सरकारी कार्यालयातील तंबाखू, गुटखा खाणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता खैर नाही; ‘या’ राज्यात कडक आदेश लागू

आतापर्यंत मानपाडा पोलीस चौकी समोरील एस. एस. मेडिकल, लोढा हेवन मधील निळजे मेडिकल, जनेरिकार्ट, संगीतावाडी मधील सिध्दी मेडिकल, गेटवेल मेडिकल, स्वामी मेडिकल, नांदिवली रस्त्यावरील विजया मेडिकल ही दुकाने चोरट्यांनी फोडली आहेत. या दुकानातील गल्ल्यातील रोख रक्कम, खाण्याच्या आवश्यक वस्तू, माहिती मधील औषधे चोरुन नेली आहेत. दुकानात चोरी झाली की देखभाल, दुरुस्तीसाठी अनावश्यक खर्च येतो. या सगळ्या प्रकाराला औषध विक्रेते वैतागले आहेत, असे वाणी यांनी सांगितले.