डोंबिवलीत गेल्या काही महिन्यांपासून औषध विक्री दुकानांमधील चोऱ्या वाढल्या आहेत. या चोरीत दुकानातील औषधाची नासाडी, भिंती, प्रवेशद्वार यांची तोडफोड केल्याने आर्थिक नुकसान होत आहे. गेल्या काही महिन्यात चोरट्यांनी एकूण सात दुकाने डोंबिवली परिसरात फोडली आहेत.यासंदर्भात डोंबिवली औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दिलीप देशमुख, नीलेश वाणी, दधुनाथ यादव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची भेट घेतली. औषध दुकानातील वाढत्या चोऱ्यांमुळे औषध दुकाने असलेल्या भागातील रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली. तसेच चोरट्यांना पकडण्यासाठी एक विशेष तपास पथक स्थापन करावे. औषध दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरट्यांची छबी कैद झाली आहे. औषध दुकानांमध्ये एक नोंदणी पुस्तक ठेऊन तेथे पोलिसांनी भेट दिल्याची नोंद आणि परिसरात पोलीस फिरत असल्याची माहिती पाळतीवर असलेल्या चोरट्यांना कळेल, अशी मागणी औषध विक्रेत्यांनी केली.
डोंबिवलीत औषध दुकानांमधील वाढत्या चोऱ्यांमुळे विक्रेत्यांमध्ये नाराजी,औषध विक्रेता संघटनेकडून पोलीस अधिकाऱ्यांची भेट
डोंबिवलीत गेल्या काही महिन्यांपासून औषध विक्री दुकानांमधील चोऱ्या वाढल्या आहेत.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-12-2022 at 17:13 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increasing number of thefts in drug shops in dombivli angers sellers amy