डोंबिवली– फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेला म्हणून आता जे बोंबा ठोकत आहेत. ते यापूर्वी उद्योजकांशी कसे वागले. ते एकदा मराठी उद्योजकांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावे. वेळ येईल तेव्हा आपण नक्की त्यावेळी काय घडले ते बाहेर काढू, असा इशारा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अडीच वर्षापूर्वी उद्योग मंत्री पद भूषविलेल्या एका मंत्र्यांचे नाव न घेता बुधवारी येथे लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता ते दिवस सरले आहेत. डोंबिवलीत उद्योग परिषदेसाठी येत आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन वरुन कळविले. त्यांनी तुम्ही जो शब्द मराठी उद्योजकांना द्यायला. तो आपण नक्की पूर्ण करू, असे आश्वासन दिल्याने राज्य सरकार पूर्णपणे मराठी उद्योजकांच्या पाठीशी ताकदीने उभे आहे, अशी ग्वाही मंत्री सामंत यांनी दिली.

सॅटर्डे क्लबतर्फे डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात उद्योजक परिषदेचे आयोजन केले होते. पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. पी. अनबलगन, एमएसएमईचे संचालक पी. एम. पार्लेवार, राज्य इनोव्हेटीव्ह सोसायटीचे सीईओ डाॅ. नामदेवराव भोसले, संयोजक संतोष पाटील, अजित मराठे, प्रदीप ताम्हणे उपस्थित होते.  

प्रत्यक्ष परिषदेला उपस्थित न राहता एखादा मुख्यमंत्री आपले आश्वासन पाळत असेल तर, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी जो उद्योग केला तो योग्यच होता असे मंत्री सामंत बोलताच सभागृहात हशा पिकला.

अडीच वर्षापूर्वी उद्योजकांशी कोण, कसे वागले हे सगळ माझ्या पेक्षा उद्योजकांना अधिक माहिती आणि ते अधिक सांगतील. मीच सर्वज्ञ, मलाच अकल्ल आणि मीच विव्दान अशा पध्दतीने सार्वजनिक क्षेत्रात मंत्र्याने आणि अधिकाऱ्याने वावरून जमत नाही. मराठी उद्योजकांबाबत यापूर्वी काय घडले. त्यांची छळवणूक कोणी कशी केली. ते आता चर्चेचा विषय नसला तरी एका मराठी उद्योजकाला तुम्ही त्याने करोना काळात रुग्णवाहिकांच्या माध्यमातून ८० हजार रुपयांचे प्राण वाचविले, १० हजार महिलांच्या प्रसुती रुग्णवाहिकेत सुखरुप होण्यास साहाय्य केले. अशा उद्योजकाच्या कामाचे १५० कोटीचे देयक देण्यासाठी छळत होता. त्यांना तासन तास दालनाबाहेर बसवून ठेवत होता. यावेळी तुमचा मराठी बाणा कोठे गेला होता, असा प्रश्न मंत्री सामंत यांनी उपस्थित करुन माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सरकार मधील काही मंत्र्यांवर टीका केली. हा सगळा प्रकार उद्योजक हणमंतराव गायकवाड यांनी जाहीरपणे सांगावा, असे आवाहन सामंत यांनी केले.

देश, विदेशात जो मराठी उद्योजक स्वच्छतेची कामे करतो. तो लाखो रोजगार तयार करतो. या विचारातून आपण बीव्हीजीचे हणमंतराव गायकवाड यांना करोना काळात पूर्ण साहाय्य केले. रोजगाराची साखळी उभी करण्यासाठी उद्जोकांना पूर्ण ताकद देणे शासनाचे काम आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आपण स्वता पूर्ण ताकदीने मराठी उद्योजकांच्या पाठीशी आहोत. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक विचारवंत गट तयार केला जाईल. उद्योजकांशी चर्चा केली जाईल. हणमंतराव गायकवाड यांच्या सारखी मंडळी त्यात असतील. या सांगोपांग चर्चेतून उद्योजकांचे प्रश्न मार्गी शासन अध्यादेश काढून मार्गी लावले जातील, असे आश्वासन सामंत यांनी दिले. यावेळी मीच शहाणा, मीच विव्दान, मलाच अक्कल या तोऱ्यात कोणीही वावरणार नाही, असा टोला अडीच वर्षापूर्वीच्या उद्योग मंत्र्यांना नाव न घेता सामंत यांनी लगावला. नवतरुण उद्योजकांना बँकांनी ३० दिवसात उद्योग वाढीसाठी निधी द्यावा यासाठी नियमावली केली जात आहे. डोंबिवलीतील १५६ कारखाने स्थलांतराबाबत एक समिती नेमून विचारविनीमय करुन त्यानंतर अंतीम निर्णय घेतला जाईल, असे सामंत म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Industries minister uday samant reaction on vedanta foxconn project zws