ठाणे : ‘ठाणेकर आहेत म्हणून आम्ही आहोत, असे वक्तव्य उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाण्यात केले. स्वातंत्र्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या आनंदोत्सव कार्यक्रमाच्या उदघाट्नप्रसंगी ते बोलत होते. यंदा या कार्यक्रमाचे तिसरे वर्षे असून ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ६ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी असे तीन दिवस हा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाट्न उद्योग मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, दिग्दर्शक मंगेश देसाई आणि अशोक हांडे यांच्या उपस्थितीत पार पडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना, ठाणेकर आहेत म्हणून आम्ही आहोत असे वक्तव्य उदय सामंत यांनी केले. सामंत पुढे म्हणाले की, ‘उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी धन्यवाद देतो की, त्यांनी हा स्तुत्य उपक्रम सुरू केला. कार्यक्रमाच्या उद्घाटनाची संधी मला आज मिळाली. या कार्यक्रमातून निर्माण होणारा निधी वैद्यकीय मदतीसाठी देणार आहे, अशा आदर्शवत संस्था महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात सुरू झाल्या आणि वैद्यकीय क्षेत्राला मदत मिळाली तर, आरोग्य विभागाचा भार कमी होईल. मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना, लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय जे स्थापन झाले त्याच्या फाईलवर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सही करण्याचे भाग्य मिळाले, ’ असे ते म्हणाले. त्यानंतर, या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या सदाबहार गीतांचा ‘अमृत लता’ हा कार्यक्रमही पार पडला.