जनसेवा फाऊंडेशन
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कुष्ठरोगी, दुर्लक्षित, आदिवासी, अंध-अपंग, मतिमंद, दीर्घ आजाराने ग्रासलेल्या वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम करणारी संस्था म्हणजे ‘जनसेवा फाऊंडेशन’. १८ वर्षे या संस्थेने आपले जनसेवेचे कार्य सुरू ठेवले आहे.
नायगावमधील विजय वैती यांनी २००० मध्ये ‘जनसेवा फाऊंडेशन’ या संस्थेची स्थापना केली. थोर समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्यांनी जनसेवेच्या कार्याला सुरुवात केली. गरीब-गरजूंना मदत करणे, त्यांच्या अडचणी आपल्या समजून त्यांचे निराकरण करणे, आदी कामांना त्यांनी सर्वप्रथम सुरुवात केली. पुढे त्यांचे लक्ष दुर्गम भागातील आदिवासींकडे गेले. मग या आदिवासी समाजाला मदत करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. वस्त्रदान, अन्नदान अशा उपक्रमांतून त्यांनी मदतीचा वसा सुरू ठेवला. आदिवासी समाजाला ताठ मानेने उभे करण्यासाठी आणि त्यांना वैचारिकदृष्टय़ा प्रगत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवला. सध्या जनसेवा फाऊंडेशनने आदिवासी, दुर्लक्षित विभागातील जवळपास १०० मुलींना दत्तक घेऊन त्यांना शिक्षण, आरोग्य, पोषक आहार आदी सुविधा त्यांनी पुरवल्या आहेत.
वसईतील कुष्ठरोगी महिलांनाही जनसेवा फाऊंडेशनने दत्तक घेतले आहे. जनसेवाच्या या कार्यात अध्यक्ष विजय वैती यांच्यासोबत प्रीती वैती, वैष्णवी राऊत, पुष्कर बाबरे, प्रमिला गंगीकर, नंदकुमार वैती, दत्तात्रय माने, रेनॉल्ड बेचरी, सायली वैती हे पथक कार्यरत आहे. ज्यांना समाजाने, कुटुंबीयांनी दूर लोटले, अशा निराधार कुष्ठरोग्यांना गेली १५ वर्षे जनसेवा फाऊंडेशनकडून मदत केली जात आहे. कुष्ठरुग्णांसाठी विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या साहाय्याने विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. दोन वेळच्या जेवणासाठी त्यांना कुणासमोर हात पसरायला लागू नये यासाठी त्यांना अन्नपुरवठा करण्याचे काम संस्थेतर्फे सुरू आहे. कुष्ठरोगी वस्तीतील रहिवाशांविषयी प्रत्येक माणसांमध्ये आपुलकी आणि आस्था वाढावी या उद्देशाने विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम आयोजित केले जातात.
कुष्ठरोग्यांच्या मुलांनाही जगाची माहिती व्हावी, ज्या समाजाने वाळीत टाकले, त्या समाजासमोर ताठ मानेने ती उभी राहावीत म्हणून ‘जनसेवा ज्ञानसंजीवनी’ योजनेतून शाळेच्या प्रवेशापासून शैक्षणिक साहित्याची मदत केली जात आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा याची चणचण भासू नये यासाठी विविध सामाजिक संस्था आणि धार्मिक मंडळांच्या साहाय्यातून अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहेत.
अंध, अपंग, मतिमंदांच्या सहवासातील आनंद स्वर्गीय सुखातील आनंदापेक्षाही मोठा आहे. तो आनंद अनुभवण्यासाठी, जगण्यासाठी जनसेवा फाऊंडेशन प्रयत्न करत आहे. विविध सण-उत्सव अंध, अपंग व मतिमंद व्यक्तींसह साजरे करून आणि त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचे काम संस्था करत आहे.
२६ डिसेंबर रोजी थोर समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाश प्रेरणा दिवस अंतर्गत रक्तदान, मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. शैक्षणिकदृष्टय़ा सुशिक्षित, सुसंस्कृत होणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थी हे भारताचे उज्ज्वल भविष्य असून सुशिक्षित तरुण भारताचा कणा आहे. हा कणा मोडू नये यासाठी जनसेवा फाऊंडेशन ज्ञानपीठाअंतर्गत गेली अनेक वर्षे दुर्गम, दुर्लक्षित डोंगर-रानात, डोंगरी व सागरी विभागात ‘चेतवू ज्ञानज्योती घरोघरी’ या पंक्तीनुसार ज्ञानदानाचे कार्य सुरू केले आहे. खेडय़ापाडय़ांतील विद्यार्थ्यांना जगाची ओळख व्हावी या शुद्ध हेतूने जनसेवा फाऊंडेशन संचालित विविध जनसेवा ग्रंथालये उभी राहत आहेत. अशा या समाजघटकाला समाजामध्ये उभे करत असताना त्यांना माणूस म्हणून ओळख निर्माण करून देत असताना जनसेवा फाऊंडेशनला सामाजिक संस्थांबरोबर सामाजिक दायित्वाची जाण असलेल्या व्यक्तींच्या सहकार्याची गरज भासत आहे. जनसेवा फाऊंडेशनच्या कार्याला मदत करण्यासाठी आपल्यासारख्यांचा हात पुढे आला तर जनसेवा फाऊंडेशन अधिकाधिक गरजू, दु:खी-पीडितांची सेवा करू शकते, असे आवाहन अध्यक्ष विजय वैती यांनी केले आहे.
जेनेरिक औषधांसाठी जनजागृती
जेनेरिक औषधे म्हणजे नक्की काय, त्याचे महत्त्व किती आहे, याविषयी सामान्यजनांना माहिती नाही. अनेक उपचारांवरील औषधे खूपच महागडी असतात. या महागडय़ा औषधांपासून सामान्यजनांना चिंतामुक्त करण्यासाठी ‘जनसेवा फाऊंडेशन’ने गेल्या काही वर्षांपासून राज्यव्यापी ‘जेनेरिक’ अभियान सुरू केले आहे. जेनेरिक औषधांविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने अनेक वैद्यकीय तज्ज्ञांच्या साहाय्याने ‘वैद्यकीय शिबीर’ आणि ‘जेनेरिक औषधे मार्गदर्शन’ असे उपक्रम राबवण्यात येत आहेत. जनसेवा फाऊंडेशन संचालित औषधपेढय़ा व्यावसायिकदृष्टय़ा नाही तर जनसेवेसाठी कार्य करत आहेत. जनसेवा मेडिको ब्रँडेड औषधांवर १० टक्के आणि जेनेरिक औषधांवर ७० टक्के सवलत दिली जाते.
अवयवदान
रक्तदान, अन्नदान, वस्त्रदान याही पलीकडचे महान दान कोणते असेल ते म्हणजे अवयवदान. अवयवदानासाठी सर्वानी पुढे यावे म्हणून जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय वैती यांनी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प करून कीर्तन, प्रवचन, अवयवदान प्रेरणा यात्रा, अवयवदान पथनाटय़ अशा विविध माध्यमांतून जनजागृती सुरू केली आहे.