कल्याण-मुलाला शाळेतून घेऊन घरी चाललेल्या एका महिलेच्या, तिच्या सोबतच्या मुलावर अंगावर जुनाट झाड कोसळले. या घटनेत आई, मुलगा जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याण पश्चिमेतील ठाणगेवाडी भागात ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणगेवाडी भागातील एका रस्त्यावरून सकाळी एक महिला आपल्या मुलासह शाळेत चालली होती. काही कळण्याच्या आत रस्त्याच्या कडेचे एक जुनाट झाड कोसळले. झाडाच्या फांद्यांचा फटका आई, मुलाला बसल्याने ते दोघेही जखमी झाले. पादचाऱ्यांनी धावपळ करून झाड बाजुला करून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या सुनिता भांगरे या आपला आठ वर्षाचा मुलगा मुलगा भाविक याला शाळेतून घेऊन घरी चालल्या होत्या. रस्त्यावरुन जात असताना ठाणगेवाडी परिसरात मोठे झाड अचानक कोसळले. यात सुनीता आणि भाविक गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी तात्काळ धाव घेऊन झाड बाजूला करुन दोघांना बाहेर काढले. रस्त्याच्या बाजूला कोसळण्याच्या स्थितीत असलेली झाडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने तात्काळ हटविली पाहिजेत. अन्यथा पावसाळ्यात मोठ्या दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Injured tree fell treatment at a private hospital thangewadi area west kalyan amy
Show comments