मूळ संकल्पना सुमेधा बेडेकर यांची होती, आणि त्यासाठी सौ.आनंदीबाई जोशी इंग्रजी शाळा, संगीत शिक्षिका वीणा जोशी, तेरा विद्यार्थी आणि पालक यांचे मोलाचे सहकार्य प्राप्त झाले. श्यामची आई चित्रपटातील श्यामची भूमिका अजरामर करणारे रंगकर्मी प्रा.माधव वझे यांनी गीत रामायणाच्या सत्राचे निवेदनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली.
संस्कारभारतीच्या ध्येय गीतीने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. सौ.वर्षां तळवेळकर यांनी संस्कारभारतीच्या कार्याच्या परिचय करून दिला. प्रा.नीला कोर्डे यांनी अभ्यासपुर्ण रीतीने रामायणाचे महत्व विशद केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या गीतगायनास प्रारंभ झाला.
रघुरायाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्रीरामयण या गीताने कार्यक्रमाला सुरूवात झाली. त्यानंतर कुश-लव रामायण गाती,
शरयु तीरावरती अयोध्या, दशरथा घे हे पयासदन अशी गीते सादर झाली आणि अल्पावधीतच उपस्थितांची दाद मिळू लागली. गाण्याचा अर्थ समजून घेऊन गाणे म्हणण्याचा प्रामाणिक प्रयत्न मुले करित होती. गायन आणि वादन अशी दुहेरी सांभाळत आपल्या कलागुणांनी मुलांनी उपस्थितांची मने जिंकली.
त्यानंतर स्वयंवर झाले सीतेचे, राम जन्मालो ग सेतू बांधा रे, जिवार जय जयकार अशी गीते सादर झाली. माता न वैरीणी या गीताला वन्समोअर ही मिळाला. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. आपली भारतीय संस्कृती विवीधतेने नटली आहे. विवीध धर्म, पंथ, विवीध कला, सण, उत्सव, व्रत-वैकल्य, चालीरिती इत्यादी या संस्कृतीच्या अमूल्य ठेवी आहेत. आपण आपल्या परीने संस्कृतीचे जतन, संवर्धन करीत हा समृद्ध वारसा नव्या पीढीकडे सपूद करतो. नव्या पिढीला याच्याशी जोडू पहातो. कारण अशा जुन्या-नव्या मिलापापासून, संगमातूनच पुडील वाढचाल सुरु रहाते. गा बाळांनो सारख्या कार्यक्रम ही काळाची निकड आहे. ह प्रयत्न स्तुत्य होता. त्यासाठी संस्करभारती, सौ.आनंदीबाई जोशी शाळा आणि विशेषत पालक आणि सहभागी विद्यार्थी या सर्वाचे मनापासून अभिनंदन करायला हवे.
हेमा आघारकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा