निती आयोगाच्या सदस्य तथा जलशक्ती अभियानाच्या नोडल अधिकारी जागृती सिंगला यांनी केली कामांची पाहणी

ठाणे :- केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या सदस्य तथा जलशक्ती अभियानाच्या नोडल अधिकारी जागृती सिंगला यांनी केंद्र शासनाच्या जलशक्ती अभियान -कॅच दी रेन अंतर्गत ठाणे जिल्ह्यात विविध विविध ठिकाणी सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांची गुरुवारी पाहणी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या सदस्या जागृती सिंगला या गेल्या दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन अभियानांतर्गत सुरू असलेल्या जिल्ह्यातील विविध कामांची माहिती घेतली. तर गुरुवारी भिवंडी तालुक्यातील कोनगाव, खळिंग, कोशिंबे गावांतील कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.

हेही वाचा >>>भिवंडीत नायब तहसीलदाराला ५० हजारांची लाच घेताना अटक

ठाणे जिल्हा प्रशासनातर्फे विविध तालुक्यांमध्ये जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. या सर्व कामांचा जागृती सिंगला यांनी आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे लघु पाटबंधारे विभागाकडून अमृत सरोवर अंतर्गत करण्यात आलेल्या गाळ काढणे, बंधारे तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत आदिवासी विकास कार्यक्रम अंतर्गत करण्यात आलेल्या डीप ऍक्वेफेर (खोल भूस्तर) पुर्नभरण कामांचीही त्यांनी यावेळी पाहणी केली. तर ग्रामीण पाणी पुरवठा विभागा मार्फत राबविण्यात आलेल्या बोअरवेलद्वारे छतावरील पावसाचे पाणी संकलन या योजनेची प्रशंसा करत या प्रकारची जास्तीत जास्त कामे घेऊन भूजलस्तर वाढविण्यात यावे, अशा सूचना ही त्यांनी सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

हेही वाचा >>>वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आव्हाडांवर उल्हासनगरात गुन्हा; सिंधी समाजाबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपची तक्रार

या योजनेबाबत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे व उपअभियंता (यांत्रिकी) संजय सुकटे यांनी माहिती दिली. तरसद्यस्थितीत या योजनेची २५ कामे पूर्ण झाली असून १३ कामे सुरू असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद शाळेतील लघु नळ योजनेमध्ये या योजनेचा समाविष्ट करुन भुजलाची पातळी वाढविण्याचा मानस असल्याचे ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी यावेळी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspection of jalshakti abhiyan works in thane by central officials amy