ठाणे – कुर्ल्यात झालेल्या बेस्टच्या अपघातानंतर सर्वच यंत्रणा सर्तक झाली आहे. ठाणे परिवहन विभागाच्या टीएमटी बस गाड्यांमध्ये चालकांसाठी ‘हे करा ’ ‘हे करु नका’ अशा स्वरुपात सुचनांची यादी लावण्यात आली आहे. यावर मद्यपान करुन गाडी चालवू नका, सीट बेल्ट बांधा असे विविध नियमावली मांडण्यात आली आहे. तर, परिवहन विभागाच्या माध्यमातून सकाळ-संध्याकाळ चालकांची ब्रेथ ॲनालाझरच्या माध्यमातून तपासणी केली जात असल्याची माहिची ठाणे परिवहन विभागाकडून देण्यात आली.

कुर्ल्यात दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या बेस्ट अपघातात निष्पाप आठ जणांचा बळी गेला. या विचित्र अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सर्वच शहरांमधील यंत्रणा सर्तक झालेली पाहायला मिळत आहे. ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत या अपघाताच्या पार्श्वभूमीवर विविध उपययोजना आखण्यात आल्या आहेत. टीएमटी बसगाड्यांमध्ये चालकांच्या आसनव्यवस्थेसमोर सुचनांची भल्लीमोठी यादी लावण्यात आली आहे. यात, ‘हे करा’ आणि ‘हे करु नका’ अशा स्वरुपात चालकांसाठी नियमावली देण्यात आली आहे.

हेही वाचा >>>कल्याणमध्ये तळीरामांची पोलीस उपायुक्तांकडून खरडपट्टी

मद्यपान करुन गाडी चालवू नये, गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नका, नेहमी सीट बेल्टचा वापर करावा, वेगमर्यादा पाळा अशा विविध सुचना यावर देण्यात आल्या आहेत. नियमित सकाळ -संध्याकाळ टीएमटी चालकांनी मद्यपान केले आहे की नाही याची तपासणी केली जाते. या तपासणी नंतरच त्या चालकाला बस चालवण्याची परवानगी दिली जात असल्याची माहिती ठाणे परिवहन विभागाकडून देण्यात आली.

 ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत टीएमटी चालकांची चाचणी

ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने टीएमटी बस चालकांची तीन दिवस चाचणी घेण्यात आली. यामध्ये चालकांना वाहतुकीचे नियम समजविण्यात आले. चालक गाडी कशी चालवत आहेत, याची चाचणी सुद्धा घेण्यात आली.

हेही वाचा >>>कल्याणमधील अल्पवयीन मुलीचा मारेकरी विशाल, साक्षी गवळीला २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

 बस गाड्यांमध्ये लावण्यात आलेली नियमावली

‘हे करा’                                                            ‘हे करु नये’

– नेहमी सीटबेल्ट लावावा                                     मद्य पिऊन गाडी चालवू नये

– गाडी चालवताना रस्त्यावर लक्ष ठेवावे                         इतर मोटार वाहने काय करणार आहेत याबद्दल गृहीत धरु नका

– वेगमर्यादा पाळा                                                 गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नका

– ट्रॅफिक सिग्नलचे पालन करा                                     वाहन चालवताना लक्ष विचलिती होईल असे काही करु नका

– गाडीची नियमितपणे देखभाल करा                         झोपेत असताना गाडी चालवू नका

– आपल्या लेनमध्येच गाडी चालवा                       

– सुरक्षित अंतर पाळा

– उजव्या बाजूने ओव्हरटेक करावे

चालकांनी मद्यपान केले आहे की, नाही हे पाहण्यासाठी सकाळ- संध्याकाळ त्यांची तपासणी केली जाते. तपासणी झाल्यानंतर खात्री करुनच चालकाला गाडी चालविण्याची परवानगी देण्यात येते. तसेच ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत चालकांची चाचणी घेण्यात आली आहे.भालचंद्र बेेहेरे, व्यवस्थापक, ठाणे परिवहन विभाग

Story img Loader