हिंदू भक्तांचे पवित्र स्थान असलेल्या अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम जोमाने सुरू आहे. मंदिराच्या गर्भगृहाचे काम वर्षभरात पूर्ण होऊन तेथे राम लल्लांची प्राणप्रतिष्ठा केली जाईल, या प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी बुधवारी येथे दिली.

डोंबिवली एमआयडीसीतील एम्स रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रमोद पाटील, एम्स रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मिलिंद शिरोडकर, संपदा शिरडोकर उपस्थित होते.

Deputy Chief Minister Eknath Shinde consoled the family of Raghunath More thane news
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रघुनाथ मोरे यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
gurpatwant singh pannu in us
Gurpatwant Singh Pannu: भारताची मागणी अमेरिकेनं फेटाळली, गुरुपतवंतसिंग पन्नूच्या बँक खात्याची माहिती देण्यास स्पष्ट नकार!
Bajrang Sonwane meets Amit Shah
“बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी”; शरद पवारांचा खासदार थेट अमित शाहांना भेटला
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
What Nitesh Rane Said?
Ladki Bahin Yojana : “दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिम कुटुंबांना लाडकी बहीण योजनेतून वगळा”, आमदार नितेश राणेंची मागणी
Maval MLA Sunil Shelke , Sunil Shelke, Paragliders,
मावळला मंत्रिपद मिळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना आकाशातून गवसणी, ११ पॅराग्लायडर्सनी ७०० फूट उंचीवरून …
allahabad highcourt
“हे हिंदुस्थान आहे, बहुसंख्याकांच्या इच्छेनुसारच देश चालणार”, न्यायाधीशांच्या वक्तव्याची चर्चा!

हेही वाचा >>> शेतकरी मोर्चेकरांची दोन मंत्र्यांनी घेतली भेट, शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा

लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत म्हणून राम मंदिराचे काम वेगात सुरू केले आहे असे काही नाही. निवडणुका आणि राम मंदिर उभारणीचा दुरान्वये संबंध नाही. आम्ही आमच्या पध्दतीने, क्षमतेने तेथे काम करत आहोत, असे गिरी महाराज यांनी स्पष्ट केले.

भगवान राम लल्लांनी अनेक दिवस कपड्याच्या मंडपात काढले आहेत. आता ते लहान स्वरुपातील मंदिरात आहेत. त्यांना आहे त्या ठिकाणी खूप दिवस ठेवणे योग्य होणार नाही. त्यांना त्यांच्या मूळ जागी बसविणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदिर उभारणीचे काम वेगात सुरू आहे, असे स्वामी म्हणाले.

देशातील अनेक ठिकाणची हिंदू धर्मस्थळे वादाच्या भोवऱ्यात आहेत. मलंगगड हे त्यामधील एक आहे. ही सर्व ठिकाणे वादातून मुक्त होऊन त्या ठिकाणांचा पुनरुध्दार होणे आवश्यक आहे, असे महाराज म्हणाले. भारत देश पुनरुत्थानाच्या मार्गावर आहे. जग आपल्याकडे आशेने पाहत आहे. आपण आता झोळी घेऊन फिरणारे नाही तर व्हॅक्सिन देणारा देश झालो आहोत, देशाची ही बदललेली प्रतिमा आपण प्रगतीच्या वाटेवर आहोत याची निदर्शक आहे. भारताचा योग, आयुर्वेद, संगीत जगात पोहचले. हीच सांस्कृतिक क्रांती जगाला व्यापून टाकणार आहे, असा विश्वास स्वामी गिरी महाराज यांनी व्यक्त केला.

हेही वाचा >>> माथाडी संघटनांच्या नावे उद्योजकांकडून खंडणी उकळणाऱ्यांविरोधात पोलिसांचा कारवाईचा इशारा

डोंबिवली सारख्या शहरातून नववर्ष स्वागत यात्रेची सुरुवात झाली आता ती जगभरात पोहचली आहे. याचाही अभिमान असल्याचे महाराज म्हणाले.

‘देश आणि बाहेर डोंबिवली जनसंघाची म्हणून ओळखली जाते. हीच ओळख अद्याप शहराची कायम आहे. सर्व धर्मियांना एका व्यासपीठावर आणून हिंदू धर्म संस्कृतीचे उत्सव उत्साहाने साजरी करणारी डोंबिवली अशी एक ओळख डोंबिवलीची आहे. सेवा हा एक हिंदू धर्म संस्कृतीचा एक भाग आहे. अशा सेवेच्या भावनेतून शहरात एक भव्य सर्वोपचारी रुग्णालय उभे राहत आहे ही रुग्णांच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. यामुळे इतर शहरात रुग्णांना उपचारासाठी जाण्याची गरज लागणार आहे, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले. डॉ. शिरोडकर यांनी नवीन रुग्णालयाच्या उभारणीविषयी आणि येथे देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधांची, शासकीय रुग्ण सेवांची माहिती दिली.

Story img Loader