मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह मजकूर लिहील्याप्रकरणी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांच्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात रोशनी शिंदे यांना ठाणे न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे रोशनी शिंदे यांना अटकेपासून दिलासा मिळाला आहे.
ही वाचा >>>ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसला पुनर्जिवत करण्याचे प्रयत्न सुरु
घोडबंदर येथे रोशनी शिंदे यांना काही महिलांची मारहाण केली होती. ही मारहाण शिंदे गटाने केल्याचा आरोप रोशनी यांनी केला आहे. तर रोशनी शिंदे यांनी समाजमाध्यमावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर लिहील्याप्रकरणी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे रोशनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान याप्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी रोशनी शिंदे यांनी वकिलांच्या माध्यमातून ठाणे न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे याप्रकरणात त्यांना दिलासा मिळाला आहे.