ठाणे: ठाणे जिल्हा परिषद, भिवंडी पंचायत समिती आणि काल्हेर ग्रामपंचायतीच्या वतीने ‘विकसित भारत संकल्प यात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मंचावरील फलकांवर राष्ट्रध्वजाचे उलटे छायाचित्र छापण्यात आले होते. याप्रकरणी फलक बनविणाऱ्या गुरुदत्त एंटरप्रायझेचे कर्मचारी अलंकार पाटील यांच्याविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राष्ट्रीय गौरव अपमान अधिनियमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विविध शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचतील या उद्देशाने देशभरात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ आयोजित केली होती. या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. ठाणे जिल्ह्यातील काल्हेर ग्रामपंचायत येथेही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे या कार्यक्रमास केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल उपस्थित होते.

हेही वाचा… कल्याण मधील दुर्गाडी-वाडेघर रस्ता ग्रामस्थांनी केला बंद, हुल्लडबाज तरूणांमुळे स्थानिक ग्रामस्थ संतप्त

परंतु येथील मंचावरील फलकांवर राष्ट्रध्वाजाचे उलटे छायाचित्र छापण्यात आले होते. यावरून प्रशासनावर टिका झाली. गटविकास अधिकारी प्रदीप घोरपडे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नारपोली पोलीस ठाण्यात कर्मचारी अलंकार पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inverted photograph of national flag on sankalp yatra banners case has been registered in thane dvr