ठाणे : जादा परताव्याचे अमीष दाखवून १२ गुंतवणूकदारांची तीन कोटी रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार वागळे इस्टेट भागात उघडकीस आला आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर घाडगे याच्याविरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाग भांडवली बाजारातून (शेअर बाजार) मासिक १० टक्के इतका परतावा मिळेल असे सांगून घाडगे याने गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची संख्या आणि फसवणुकीतील रक्कम वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – २७ गावांमधील नागरी समस्यांवरून संघर्ष समितीचे कडोंमपासमोर धरणे आंदोलन

वागळे इस्टेट येथे ज्ञानेश्वर घाडगे याने काही महिन्यांपूर्वी इनकम रुट इनवेस्टमेंट ॲंड फायनान्शियल सर्व्हिसेस नावाने एक कंपनी स्थापन केली होती.
या कंपनीद्वारे त्याने भाग भांडवली बाजारात पैसे गुंतविण्यात येत असून गुंतवणुकीवर मासिक १० टक्के परतावा मिळेल अशी जाहिरात करण्यास सुरूवात केली. त्यामुळे अनेकांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली. गुंतवणूकदारांना विश्वास व्हावा म्हणून सुरुवातीचे काही महिने त्याने त्यांना परतावा दिला. त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यांच्या नातेवाईकांनाही याची माहिती दिली. त्यांनीही या कंपनीत त्यांच्या पैशांची गुंतवणूक केली. परंतु फेब्रुवारीनंतर घाडगे हा कंपनी बंद करून निघून गेला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बुधवारी काही गुंतवणूकदारांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार घाडगे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.