कल्याण – नवी मुंबई येथे येत्या रविवारी राज्य शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून २० लाख अनुयायी (सद्गुरू) उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामुळे या कार्यक्रमाला साहाय्य म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेने मनुष्यबळासह कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या बस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या रविवारी नवी मुंबईतील खारघर येथील कार्पोरेट पार्क येथे रेवदंड्याचे समाजसेवक दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी यांना शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे लाखो सद्गुरू उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने नवी मुंबई महापालिका, सिडको, स्थानिक प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.

Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
In politics of district Mamu factor implemented in Akot constituency once again come into discussion
‘मामु’ फॅक्टर चालणार?, दलितांसह इतरांचे एकगठ्ठा मतदान…
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
Jharkhand campaign trail
आश्वासनं देण्याची चढाओढ, झारखंडमझ्ये भाजपा-इंडिया आघाडीत वेगळीच स्पर्धा!
maharashtra assembly election 2024, Mahayuti Campaign, Palghar, Dahanu,
महायुतीच्या प्रचारात गुजरातमधील निरीक्षकांची देखरेख
maharashtra vidhan sabha election 2024 ,
बेलापूरच्या प्रचारात राम, कृष्ण, गजाननाचा गजर !
Two prestigious awards for GP Parsik Bank
जीपी पारसिक बँकेला दोन प्रतिष्ठित पुरस्कार

हेही वाचा – कल्याणमध्ये उच्चशिक्षित तरुणांचा दारु पिऊन रस्त्यावर धिंगाणा

हा विचार करून या कार्यक्रमातील खारीचा वाटा म्हणून कल्याण डोंबिवली पालिकेने या कार्यक्रमासाठी केडीएमटीच्या ५० बस अनुयायांच्या सोयीसाठी कार्यक्रमस्थळी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पाण्याचे १५ टँकर्स, २०० सफाई कामगार, पाच रोड रोलर, या कार्यक्रमाचा प्रचार करण्यासाठी १०० हून अधिक लावण्याची जबाबदारी कल्याण डोंबिवली पालिकेने घेतली आहे.

हेही वाचा – टिटवाळ्यात रस्त्यावरील बेवारस वाहनांवर जप्तीची कारवाई

कल्याण डोंबिवली पालिका मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे, समन्वय अधिकारी उपायुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून या यंत्रणेची अंमलबजावणी केली जात आहे. कार्यक्रम योग्यरितीने पार पाडावा म्हणून कल्याण डोंबिवलीतील काही अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. कार्यक्रम शांततेत, सुस्थितीतपणे पार पाडावा या उद्देशाने हे साहाय्य स्थानिक प्रशासनाला केले जात आहे, असे आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.