ठाणे : महापालिका क्षेत्रातील विविध भागांमध्ये पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी पुढे येत असतानाच येऊर भागात बेकायदा उभारलेले बंगले, हाॅटेल, स्पोर्ट्स क्लब, टर्फ क्लब, लॉन्स या ठिकाणी बेकायदा नळजोडण्या घेण्यात आल्याची बाब समोर आली आहे. येऊर वनक्षेत्राच्या हद्दीत असलेल्या भारतीय हवाई दलाच्या वसाहतीसाठी आणि आदिवासी पाड्यांसाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकीवरून या नळजोडण्या घेण्यात आलेल्या असून अनधिकृतपणे घेतलेल्या नळ जोडण्या तातडीने खंडित करण्यात येऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशा मागणीचे पत्र काँग्रेसने ठाणे महापालिका आयुक्तांना दिले आहे. यानिमित्ताने येऊरमधील बेकायदा नळजोडण्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

येथील येऊर भागात बेकायदा सुरू असलेल्या हाॅटेलमध्ये पहाटेपर्यंत संगीत आणि मद्य पार्ट्या सुरू असल्याचा मुद्दा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला होता. त्यापाठोपाठ आता येऊर बेकायदा बांधकामांचे आगार बनल्याचा आरोप ठाणे काँग्रेसने केला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर असलेल्या येऊरमध्ये तीनशेहून अधिक बेकायदा बंगले, हाॅटेल आणि खेळाचे टर्फ असून त्याचबरोबर महापालिका आणि महसूल विभागाने बांधकाम परवानगी दिलेले बंगलेही नियमानुसार बेकायदेशीर असल्याचा दावा काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. या बंगल्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी नुकताच दिला असून या पार्श्वभूमीवर त्यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना पत्र पाठविले आहे. त्यात येऊर वनक्षेत्राच्या हद्दीत असलेल्या भारतीय हवाई दलाच्या वसाहतीसाठी आणि आदिवासी पाड्यांसाठी बांधलेल्या पाण्याच्या टाकीवरून बेकायदा बंगले, हाॅटेल, स्पोर्ट्स क्लब, टर्फ क्लब, लॉन्स याठिकाणी अनधिकृतपणे नळजोडण्या घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. येऊर वनक्षेत्राच्या हद्दीत असलेल्या भारतीय हवाई दलाच्या वसाहतीसाठी व आदिवासी पाड्यांसाठी पाण्याची विशेष टाकी देण्यात आलेली आहे. त्याबाबत हवाई दलाशी करार करण्यात आला असतानाही येथे अनधिकृतपणे असलेले स्पोर्ट्स क्लब, टर्फ क्लब, रेस्टॉरन्ट, रिसॉर्ट, लॉन्स,हॉटेल्स,बंगले इतर आस्थापनांनी अनधिकृतपणे नळजोडण्या घेतल्या आहेत. त्या तातडीने खंडित करण्यात येऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. अशाचप्रकारचा आरोप झाल्यानंतर पालिकेने वर्षभरापूर्वी या ठिकाणी बेकायदा नळजोडण्यांचा शोध घेऊन त्या खंडीत करण्याची कारवाई केली होती. परंतु आता पुन्हा तशाचप्रकारचा आरोप झाल्याने येऊरमधील बेकायदा नळजोडण्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा – शिळफाट्यात माफियांकडून कच्च्या तेलाची चोरी, आगीमुळे धक्कादायक वास्तव उघड

ठाणे महापालिकेच्या घन कचरा विभागामार्फत येऊन वनक्षेत्राच्या प्रतिबंधित हद्दीत असलेले क्लब, हॉटेल, लॉन्स या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमा होणारा कचरा संकलित करण्यासाठी घंटागाडी पाठवण्यात येते का ? कायद्यामध्ये तशी तरतूद आहे का ? अशी विचारणाही विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. महापालिकेच्या वर्तक नगर प्रभाग समितीने येऊर वनक्षेत्र परिसरात एकूण किती बांधकामे आहेत, याची गणना करून आतापर्यंत किती अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आणि नेमकी काय कारवाई केली. तसेच महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाने येऊर वनपरिक्षेत्राच्या प्रतिबंधित क्षेत्रात कोणत्या नियमाच्या आधारे आतापर्यंत किती बांधकामांना परवानग्या दिली, याची विचारणाही त्यांनी पालिकेकडे केली आहे.

हेही वाचा – अंबरनाथ हल्ला प्रकरणातील ‘मोक्का’तील १६ जणांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

येऊर येथील बंगले, हाॅटेल, टर्फ आणि लाॅन्स उभारणी करताना बांधकाम साहित्यावर वस्तू व सेवा कर भरला आहे, याची तपासणी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी संबंधित विभागाकडे केली आहे. सर्व प्रकारच्या वाहनांना विना तपासणी सरसकट प्रवेश दिला जातो. यामुळे भविष्यात येऊर भागात स्फोटके नेऊन अतिरेकी कारवाया करण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या हवाईदल स्टेशन व उपग्रह दळणवळण केंद्र यांना गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चेकपोस्टवर कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून वाहनांच्या नोंदीचे व तपासणीचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.