बँकिंग फ्रंटियर’ या प्रतिष्ठीत मासिकातर्फे २०२१-२०२२ या वर्षासाठी अंबरनाथ जयहिंद को. ऑपरेटीव्ह बँकेला दोन विभागात उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाले आहेत. याबाबतची माहिती संस्थापक अध्यक्ष विलास देसाई यांनी दिली. ‘बेस्ट इनव्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह’ आणि ‘बेस्ट ई पेमेंट इनिशिएटिव्ह’ या दोन विभागात बँकेला पुरस्कार मिळाले आहेत.

हेही वाचा- डोंबिवलीतील भागशाळा मैदानातील कोकण महोत्सवाला क्रीडाप्रेमींचा विरोध

माजी केंद्रीय उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते इंदौर येथे झालेल्या समारंभात बँकेला हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. बँकेचे संचालक बाबू टिपे, संदीप जोशी, संध्या वालावलकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कुरणकर, अधिकारी मेधा मंडलेकर यांनी हे पुरस्कार स्वीकारले. प्रतिष्ठीत संस्थेकडून दोन पुरस्कार मिळणे ही बँकेसाठी अभिमानास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष विलास देसाई, उपाध्यक्ष अँड. नंदकुमार भोळे, संचालिका रूपा देसाई-जगताप यांनी व्यक्त करून सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Story img Loader