ठाणे- जालन्यातील मराठा आंदोलनात झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजातर्फे उद्या, सोमवारी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला काँग्रेस पक्षासह भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार गट), मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील मराठा नेत्यांनी पाठींबा दिला आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी शहरात बंदोबस्त तैनात केला आहे.
हेही वाचा >>> “ज्या झाडाला फळ येतात त्याच झाडावर…”, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओबाबत भाजपा आमदाराची टीका
मराठा आरक्षणासंदर्भात सुरु असणारे आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होत आहे. जालन्यातील आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याचे पडसाद समाजातील अनेक स्तरांवर उमटतांना दिसत आहेत. असे असतानाच मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजातर्फे सोमवारी ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. या संदर्भात शनिवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सकल मराठा समाजाचे ठाणे जिल्हाध्यक्ष व भाजपचे शहर पदाधिकारी रमेश आंब्रे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दत्ता चव्हाण, ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मनसेचे नेते अविनाश जाधव, राष्ट्रवादी(शरद पवार गट) ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई, भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष प्रदीप शिंदे आणि पदाधिकारी राजेंद्र महाडिक यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते. हा बंद शांततेच्या मार्गाने करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तर, कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी भूमिका मांडत काँग्रेस पक्षाने ठाणे बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.
हेही वाचा >>> मुंबई, ठाण्यात वाहतूक कोंडीचे विघ्न; गणेश मिरवणुका, खरेदीची लगबग
ठाणे शहरात बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी ठाणे पोलिसांकडून शहरात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सुमारे दोन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहरात तैनात असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही ठाण्यात निवासस्थान आहे. येथेही पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. शहरात ४५ निरीक्षक, सुमारे १६० साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, सुमारे १ हजार ३०० कर्मचारी, दंगल नियंत्रण पथकांच्या दोन तुकड्या, राज्य राखीव दलाच्या सहा तुकड्या असा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. तसेच रास्ता रोको टाळण्यासाठी महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवरही पोलीस तैनात असतील.