लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: डोंबिवली जवळील ठाकुर्लीतील १५ गुंतवणूकदारांकडून सोन्याचे दागिने घेऊन, त्यांना कर्जाचे आमिष दाखवून त्यांची ३१ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या जवाहिऱ्याला रामनगर पोलिसांनी राजस्थान मधून बुधवारी अटक केली. पाच वर्षापासून फरार असलेल्या या जवाहिऱ्याच्या मागावर पोलीस होते.
सोहनसिंह चैनसिंह दसाना (५२, महालक्ष्मी ज्वेलर्स, अंकिता सोसायटी, ठाकुर्ली पूर्व) असे अटक करण्यात आलेल्या जवाहिऱ्याचे नाव आहे. ठाकुर्ली भागात आरोपी सोहनसिंह अनेक वर्षापासून सोने-चांदी दागिन्यांचा व्यापारी म्हणून व्यवसाय करत होता. परिसरातील अनेक ग्राहकांचा त्याने विश्वास संपादन केला होता. भिशी, कर्जाऊ योजना तो आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून राबवित होता.
हेही वाचा… डोंबिवलीत खोदलेल्या रस्त्यांनी नागरिक हैराण; शिवमंदिर रस्त्यावरील स्मशानभूमीला कोंडीचा विळखा
जून २०१८ ते जून २०२२ या कालावधीत जवाहिर सोनसिंह दसाना याने ठाकुर्लीत राहणाऱ्या मिनु प्रमोद गांधी (५३) यांच्यासह इतर १५ ग्राहकांचा विश्वास संपादन केला. या ग्राहकांकडून सोन्याचे दागिने घेऊन त्यावर कर्जाऊ रक्कम देण्याचे आश्वासन दिले. तसेच, सोन्याचे दागिने बनविण्यासाठी ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घेतली. अशाप्रकारे ३१ लाख ५३ हजाराची पुंजी जमा झाल्यानंतर सोहनसिंह याने ग्राहकांना त्यांनी जमा केलेल्या सोन्याच्या रकमेवर कर्जाऊ रक्कन न देता, त्यांना सोन्याचे दागिने बनवून न देता त्यांना सुरुवातीला वेळकाढूपणाची उत्तरे दिली.
हेही वाचा… कल्याणमध्ये ‘द केरला स्टोरी’ पाहण्यासाठी तरुणी, महिलांची गर्दी
जुना व्यापारी असल्याने तो फसविणार नसल्याचे ग्राहकांना वाटले. एक दिवस सोहनसिंह याने ठाकुर्लीतील महालक्ष्मी ज्वेलर्सला टाळे ठोकून पळ काढला. ग्राहक दररोज दुकानात येऊ लागले. त्याला संपर्क करू लागले तर तो प्रतिसाद देत नव्हता. अनेक दिवस उलटून सोहनसिंह प्रतिसाद देत नसल्याने त्याने आपली फसवणूक केली असल्याची खात्री तक्रारदार मिनू गांधी यांच्यासह १५ ग्राहकांची झाली. मिनू यांच्या तक्रारीवरुन रामनगर पोलीस ठाण्यात सोहनसिंह विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
हेही वाचा… ठाणे : महावितरणच्या कार्यालयाला आग
मागील पाच वर्षापासून पोलीस सोहनसिंहचा शोध घेत होते. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना सोहनसिंह राजस्थान जिल्ह्यातील गटबोर तालुक्यातील थुरावड गावात लपून बसल्याची माहिती मिळाली.
पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या आदेशावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समशेर तडवी, साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप, हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, नितीन सांगळे, पी. के. पाटील, एल. पी. निसार, एस. पी. पिंजारी यांनी सोहनसिंह राहत असलेल्या भागात तळ ठोकला. तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला तेथून अटक केली. या अटकेमुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.