लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : येथील फडके रोडवरील एका सराफाच्या दुकानात दागिने खरेदी करण्याच्या उद्देशाने गुरूवारी दुपारी तीन वाजता तीन महिला ग्राहक म्हणून आल्या. त्यांनी जवळील बनावट सोन्याचे दागिने खरे फासवून त्या बदल्यात दुकानातील १० लाख ७१ हजार रूपयांचे खरे दागिने घेऊन सऱाफाची फसवणूक केली आहे.

Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
the survey team of the administration seized gold worth 35 lakhs In Ratnagiri
रत्नागिरीत प्रशासनाच्या सर्वेक्षण पथकाने ३५ लाखांचे सोने पकडले
young woman arrested for stealing, shopping,
सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
eight lakh rupees forgotten in a rickshaw returned to a female passenger In Kalyan
कल्याणमध्ये रिक्षेत विसरलेला आठ लाखाचा ऐवज महिला प्रवाशाला परत
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक

खरेदीदार महिला खरे दागिने घेऊन गेल्यानंतर दुकानादाराला संशय आला. त्याने तातडीने महिलांकडून ताब्यात घेतलेल्या दागिन्यांची तपासणी केली. त्यावेळी ते बनावट असल्याचे आढळले.पंकज महेंद्र शंकळेशा (३८) असे फसवणूक झालेल्या सराफाचे नाव आहे. त्यांचे डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरील साई आर्केड सोसायटीत गणपती मंदिराच्या बाजुला सोन्याची पेढी आहे. त्यांचे कल्याण येथेही शिवाजी चौक भागात जवाहिऱ्याचे दुकान आहे.

आणखी वाचा-कल्याणमध्ये सात लाखाचा गुटखा जप्त; पाच आरोपी फरार

पोलिसांनी सांगितले, गुरूवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तीन अनोळखी महिला ग्राहक म्हणून साई आर्केडमधील जवाहिर पंकज शंकळेशा यांच्या दुकानात आल्या. त्यांनी आपल्याकडे काही दागिने आहेत. ते दागिने देऊन त्या बदल्यात अन्य कलाकुसरीचे दागिने खरेदी करायचे आहेत असे जवाहिर पंकज आणि त्यांच्या मंचकासमोरील कर्मचाऱ्यांंना सांगितले. दागिने खरेदी करत असताना या तीन महिला भुरट्या असल्याने त्या हालचलाखी करत कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून ठेऊन दागिन्यांची पारख करत होत्या. या महिलांनी स्वताकडील बनावट दागिने दुकानदाराला देऊन त्या बदल्यात १० लाख ७१ हजार रूपयांचे दागिने खरेदी केले.

या महिला दागिने खरेदी करून गेल्यानंतर दुकानदार शंकळेशा यांना संशय आला. त्यांनी दागिन्यांची पारख करून घेतली तर ते बनावट असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने रामनगर पोलीस ठाण्यात तीन महिलांविरूध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलीस उपनिरीक्षक पी. के. देसाई तपास करत आहेत.