लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शहापूर : येथील महालक्ष्मी ज्वेलर्स या सराफाच्या दुकानात काम करणाऱ्या दिनेश चौधरी (२५) यांच्यावर गोळीबार झाला होता. रविवारी सकाळी त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर शहरापूरमधील व्यापारी संघटनांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

शहापूर येथील पंडित नाका परिसरात महालक्ष्मी ज्वेलर्स हे सराफाचे दुकान आहे. शनिवारी रात्री दुकानातील कामगार दिनेश चौधरी हे दुकान बंद करून निघाले असता, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी चौधरी यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले. घटनेची माहिती पोलीसांना मिळाल्यानंतर उपअधीक्षक मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांसह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात येत असून अधिक तपास सुरू आहे.

आणखी वाचा-शहापुरातील सराफच्या दुकानातील कामगारावर गोळीबार

दरम्यान चौधरी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु रविवारी सकाळी चौधरी यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. गोळीबार करणारे अनोळखी असून गोळीबाराचे कारणही समजू शकलेले नाही असे पोलिसांनी सांगितले. गोळीबारानंतर रविवारी सकाळी शहापूर येथील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. तसेच घटनेचा निषेध म्हणून व्यापाऱ्यांनी मूक मोर्चा काढला होता.