लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात ठितकठिकाणी संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. रविवारी भिवंडी पश्चिम येथे भरारी पथक आणि नारपोली पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत एका संशयित वाहनांतून कोट्यवधी रुपयांचे दागिने नेले जात होते. या दागिन्यांपैकी तीन लाख ३१ हजार ६०९ रुपयांचा मुद्देमाल विना तपशील आढळून आला आहे. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तो कुठे नेला जात होता याची चौकशी सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदार संघामध्ये तपासणी केंद्र आणि भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. रविवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक संशयित वाहन वाहतुक करत असल्याचे भरारी पथक आणि नारपोली पोलिसांना आढळून आले. संबंधित वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. या वाहनामध्ये असलेल्या वस्तूंबाबत पोलिसांनी चौकशी केली असता वाहनचालक व वाहनातील इतर कर्मचाऱ्यांना त्याबाबत माहिती देता येत नव्हती. पोलिसांनी हे वाहन नारपोली पोलीस ठाण्याच्या आवारात आणले. पोलीस आणि भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी वाहनातील साहित्य कुरिअर एजन्सीच्या मालक व पंचासमक्ष खाली उतरवले.
आणखी वाचा-कल्याणमध्ये उमेदवारी न दिल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे सामुहिक राजीनामे
संशयित वाहनातून ७३ छोटे मोठ्या खोक्यांमधील साहित्य व त्या साहित्याच्या देयकांची तपासणी केली. या वाहनामधील खोक्यांमध्ये सोने, चांदी आणि भेटवस्तू असे एकूण दोन कोटी आठ लाख १७ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल आढळला. तपासणी दरम्यान संबंधित कुरिअर चालकाने खोकेनिहाय त्यात समाविष्ट असणाऱ्या साहित्य व तपशील असणारे पक्के देयक सादर केले. त्यानुसार एकूण ६० खोक्यांमध्ये असलेल्या दागिन्यांचे आणि भेट वस्तूंचे दोन कोटी चार लाख ८६ हजार २११ रुपयांचे देयक सादर करण्यात आले. तर उर्वरित तीन लाख ३१ हजार ६०९ रुपयांचा मुद्देमाल ज्यात चांदी व चांदीच्या भेटवस्तू आहेत. त्यांचे देयक संबंधितास सादर करता आले नाही. याबात पोलीस अधिक तपास करीत आहेत.