ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मारहाण केल्यानंतर चर्चेत आलेले अनंत करमुसे यांच्याविरोधात अदखपात्र गुन्हा मंगळवारी रात्री कासारवडवली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. शेजाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी हा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेजाऱ्याविरोधातही अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे षड्यंत्र असल्याचा आरोप अनंत करमुसे यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घोडबंदर भागात अनंत करमुसे हे राहतात. त्यांच्या समोरील सदनिकेत सुनील मिल्ल हे राहतात. मंगळवारी अनंत आणि सुनील यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले. या वादाचे रूपांतर हाणामारी झाले. त्यानंतर दोघेही कासारवडवली पोलीस ठाण्यात आले. करमुसे यांची पत्नी या गृहसंकुलाच्या समितीच्या पदाधिकारी असून त्यांनी आपले घरातील साहित्य बाहेर ठेवले होते.

हेही वाचा >>> मोटारमनच्या डब्यात प्रवेश करून लोकल अडविणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, या बाबत त्यांना विचारणा करण्यासाठी गेलो असता त्यांनी बाचबाजी सुरू केली. आणि त्यानंतर अनंत करमुसे आणि त्यांच्या भावाने मला बेदम मारहाण केली. त्यात माझ्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे सुनील यांनी सांगितले. तर करमुसे यांनी हे षड्यंत्र भाग असावा असा आरोप केला आहे. साहेबांना त्रास देतोस, असे सुनील म्हणत होते. त्यामुळे त्यादिशेने तपास करावा असा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात दोघांविरोधात परस्पर अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, सुनील यांंनी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळा घातल्याने त्यांच्याविरोधात पोलीस फिर्यादीनुसारही कारवाई करण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awad beaten indictable offense against anant karamuse ysh
Show comments