लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठाणे : मी पक्ष सोडून गद्दारी केल्याचा, विश्वासघाताचा आरोप आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड करतील तेव्हा त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी आव्हाड यांना पुन्हा आव्हान दिले.
अमली पदार्थ विक्रीप्रकरणी नाशिक पोलिसांनी मुंब्रा येथून सलमान फाळके याला ताब्यात घेतले आहे. सलमान याच्या अटकेनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे पदाधिकारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. शुक्रवारी आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह शरद पवार गटाचे ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई यांच्यावर टिका केली. शारिरीक विकलांग व्यक्तींबाबत आपणास संवेदना व सहानुभूतीची भावना असते. पण सुहास देसाई यांनी माझ्यावर जे आरोप केले ते पाहता सुहास देसाई हे बौद्धिक विकलांग आहेत असे परांजपे म्हणाले. शिवसेना प्रवक्त्या आमदार मनिषा कायंदे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे सलमान याच्यासोबत छायाचित्र दाखविले.
आणखी वाचा-ठाणे: ‘धर्मवीर’मधील बाल कलाकाराचे वाहतुक कोंडीसंदर्भात प्रशासनाला पत्र
मनिषा कायंदे यांना उत्तर देण्याऐवजी माझ्यावर टिका करण्याची गरज नव्हती असेही ते म्हणाले. सुहास देसाई व माजी नगरसेवक शानू पठाण यांनी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस (अजित पवार गट) नजीब मुल्ला यांचे सलमान याच्याबरोबरचे छायाचित्र पत्रकार परिषदेत दाखविले होते. हे छायाचित्र २०१७ सालचे आहे. तेव्हा नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला सलमान फाळके आला होता. ते फेसबुकवरचे छायाचित्र आहे. आम्ही ते नाकारत नाही. डॉ. जितेंद्र आव्हाड व शानू पठाण यांचे छायाचित्र दाखवून कोणी आरोपी होत नाही, असे मी स्पष्टपणे म्हटले होते. राजकीय नेत्यांचे अशी छायाचित्रे हा काही पुरावा होत नसल्याचेही परांजपे म्हणाले.