लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झालेला असतानाही त्याच्यावर पाच तास अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांद्वारे केला आहे. रुग्णालयात सुरू असणारे प्रकार पाहून मी सुन्न झालो,तळपायाची आग मस्तकात गेली, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात हा प्रकार सुरू आहे, असा प्रश्न उपस्थित करत यात काही कारवाई होईल ही आशा नाहीच, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

गेली अनेक दिवस झाले ठाण्यातील शिवाजी रुग्णालया बाबतच्या तक्रारी कानावर येत होत्या.आज एका महिलेचा फोन आला की,तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत,परंतु रुग्णालय प्रशासन त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाहीये.काय प्रकार आहे हे जाणून घ्यावा म्हणून रुग्णालयात गेलो असता,रुग्णालयात सुरू असणारे प्रकार पाहून मी सुन्न झालो,तळपायाची आग मस्तकात गेली, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा-कल्याण मध्ये घर जप्तीच्या कारवाईमुळे आत्महत्येचा प्रयत्न

त्या महिलेचा पती हा सामान्य कक्षामध्ये उपचार घेत होता. तेथे पोहचलो असता, संबंधित रुग्णाला अतिदक्षतामध्ये शिफ्ट करण्यात आले असल्याचे समजले. तिकडे गेल्यावर कळाले की त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तरी तेथील डॉक्टर्स आणि प्रशासन त्या रुग्णावर ५ तास उपचार करत होते.थोडक्यात रुग्ण आधीच दगावला होता. परंतु रुग्णालय प्रशासनाने याची काहीही माहिती त्या महिलेला दिली नव्हती. उलट ५ तास त्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचे ते सांगत होते. याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आणि डॉक्टरांना जाब विचारला असता,त्या प्रशासकीय अधिकारी आणि डॉक्टर लोकांची बोलती बंद झाली, असे त्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा-कळवा रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णाचा मृत्यू; उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

मेलेल्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचे दाखवून त्या रुग्णाच्या पार्थिवाला अतिदक्षता विभागामध्ये नेण्यात येते. तिथे आधीच गंभीर रुग्ण उपचार घेतअसतात. या गंभीर रुग्णांना, दगावलेल्या रुग्णामुळे संसर्ग होऊन त्या जिवंत असणाऱ्या रुग्णांचा देखील जीव अजूनच धोक्यात टाकण्यात येतो. आज दिवसभरात या रुग्णालयात ५ रुग्ण दगावले आहे. या रुग्णालयात अक्षरशः गरिबांची फसवणूक आणि लूट सुरू आहे. देयक वाढवून लावली जात आहेत, डॉक्टर वेळेवर कामाला येत नाहीत. इतकंच काय तर मेलेल्या रुग्णांवर देखील उपचार सुरू असल्याचे दाखवून ही मंडळी पैसे कमवत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

Story img Loader