ठाणे : आमच्या अनेक उमेदवारांनी पुनर्मोजणीसाठी निवडणुक विभागाकडे रितसर पैसे भरले आहेत. परंतु मतदान झालेल्या यंत्रातील माहिती नष्ट करण्यात आल्यामुळे या यंत्रात काहीच बिघाड नव्हती, हे दाखविण्यासाठी दुसरी मतयंत्र दाखविली जाणार आहेत, असा दावा करत हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या आमच्या अनेक उमेदवारांनी पुनर्मोजणीसाठी मागणी केली आहे. त्यासाठी निवडणुक विभागाकडे रितसर प्रति यंत्रासाठी ४६ हजार रुपये भरले आहेत. परंतु त्यांना परंतु मतदान झालेल्या यंत्रातील माहिती नष्ट करण्यात आल्यामुळे या यंत्रात काहीच बिघाड नव्हती, हे दाखविण्यासाठी दुसरी मतयंत्र दाखविली जाणार आहेत. ज्या यंत्रात मतदान झाले, ते दाखविणार नसतील आणि त्याजागी दुसरे यंत्र दाखविणार असतील तर पुनर्मोजणीचा काय उपयोग आहे, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. ज्या मतदान यंत्रात मतदान झाले, त्यातील मतदानाची माहिती नष्ट करण्यात आली आहे. यावरूनच लक्षात येते की, येथे घोटाळा झाला आहे. काही तरी लपवायचे असेल असे प्रकार केले जातात, असा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा…मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे म्हणतात, बघ माझी (मनसे) आठवण येते का?
२०१९ ते २०२४ या कालावधीत ५ लाख नवीन मतदान नोंदणी झाली. तर, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत ४६ लाख नवीन मतदार झाली. निवडणुक विभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही आणि जुन्याच यंत्रणा आहेत. साधी आपली मतदार यादी योग्य नसते. त्यातील दुबार मतदारांबाबत तक्रारी करूनही ती वगळली जात नाही. पाच वर्षात केवळ ५ लाख मतदार वाढलेले असताना, सहा महिन्यात ४६ लाख मतदार वाढले कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. मतदान यंत्रामध्ये झालेल्या मतदानाची आकडेवारी दिसून येते. पक्षाचे प्रतिनिधींसमोर ही यंत्र बंद केली जातात. तेव्हाच मतांची आकडेवारी निवडणुक विभागाला प्राप्त होते.
हेही वाचा…भाज्यांचे दर कडाडले; थंडीच्या लाटेमुळे भाजी काढणीसाठी विलंब झाल्याने आवक घटली
परंतु दुसऱ्या दिवसांपर्यंत निवडणुक विभागाच्या आकडेवारीत वाढ होते कशी, असा प्रश्न उपस्थित करत या सगळ्यात निवडणुक विभागाचा सहभाग असल्याचा आरोपही त्यांनी केला. निवडणुक विभागाने या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत कारण, तो आमचा अधिकार आहे. असेच सुरू राहीले तर लोकशाही नावाचा देश होता, हे इतिहासात लिहीण्याची वेळ येईल, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवर महाराष्ट्र संशय व्यक्त करत आहे ही चांगली गोष्ट नाही. या यंत्रामध्ये पारदर्शकता नाही. कारण माझे मत कुठे जाते हेच कळत नाही. हा सगळा घोटाळा असून त्याच्या शेवटपर्यंत जाऊन शोध घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.