राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमधील आवाज ठाणे पालिकेचे सहआयुक्त महेश आहेर यांचा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर आव्हाड यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी केली जात आहे. मात्र अद्याप आम्हाला कोणताही सुरक्षा पुरवली नसल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांची कन्य नताशा आव्हाड यांनी दिली आहे. त्या आज पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >> बहिणीचा बॅनरवरील फोटो पाहिला अन् घरी परतला, सुषमा अंधारेंचा १८ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ सापडला!

अद्याप सुरक्षा पुरवण्यात आलेली नाही

“दोन दिवसांपूर्वी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मी आणि माझ्या आईने महेश आहेर यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र ठाणे पोलिसांनी अद्याप आमची तक्रार घेतलेली नाही. आम्हाला अद्याप कोणतीही सुरक्षा पुरवण्यात आलेली नाही. आमच्या सुरक्षेची हमी आम्हाला कोण देणार. पोलीस आम्हाला मदत करत नाहीयेत. देवेंद्र फडणवीस आम्हाला म्हणाले होते की आम्हाला सुरक्षा दिली जाईल. मात्र अद्याप सुरक्षा पुरवण्यात आलेली नाही” असे नताशा आव्हाड यांनी सांगितले.

हेही वाचा >> संजय राऊत यांना तुरुंगात मारण्याचा प्रयत्न? पत्रकार परिषदेतील विधानामुळे खळबळ; म्हणाले “मी योग्य वेळी…”

मी आणि माझा नवरा राजकारणात नाहीत

“महेश आहेर यांनी तक्रार केल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांविरोधात लगेच कारवाई करण्यात आली. मात्र मी जेव्हा पोलिसांकडे गेले तेव्हा मात्र काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. महेश आहेर यांना अद्याप निलंबित करण्यात आलेले नाही. मी आणि माझा नवरा राजकारणात नाहीत. तरीदेखील मला राजकारणात ओढले जात आहे. त्यामुळे मला माध्यमांसमोर येऊन हे सांगावे लागत आहे. पुरावे समोर असूनही आमची मदत केली जात नाहीये,” असा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीने केला आहे.

हेही वाचा >> ‘तुरुंगात मला जीवे मारण्याचा प्रयत्न,’ संजय राऊतांच्या आरोपावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सकाळी…”

माझ्या घरातील सगळेच घाबरलेले आहेत

“माझ्या नवऱ्याची फॅमिलीही राजकारणात नाही. जे लोक राजकारणात नाहीत, त्यांच्यासाठी अशा गोष्टी नेहमीच्या नाहीत. त्यामुळे माझ्या परिवारासाठी ही खूप धक्कादायक बातमी होती. माझ्या कुटुंबाने माझ्या नवऱ्याला घराबाहेर निघू नको, असे सांगितलेले आहे. माझ्या घरातील सगळेच घाबरलेले आहेत,” असेही आव्हाड यांची कन्या नताशा यांनी सांगितले आहे.