लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : मैत्रीत वितृष्ट आल्याने पंधरा ते सोळा वर्षांपुर्वी एकमेकांपासून दुरावलेले राज्याचे विद्यमान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे दोघे मित्र उपवन फेस्टीवलच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आल्याचे दिसून आले. या दोघांनीही व्यासपीठावरून जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांचे तोंडभरून कौतुक केले. त्याचबरोबर ‘तुझे काम असेच प्रगतीपथकावर राहो. सगळ्यापेक्षा वेगळ्या कामाने चमकावे, कोणत्याही वादात पडू नकोस, तू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा मार्ग सरळ करून ठेव की, सर्व काही व्यवस्थित होईल’, असा मित्रत्वाचा सल्ला आव्हाड यांनी सरनाईक यांना दिला.

Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
Supriya Sule
Supriya Sule : वडिलांवर घणाघाती टीका झाल्यानंतरही सुप्रिया सुळेंची संयमी प्रतिक्रिया, अमित शाहांना म्हणाल्या…
What Amruta Fadnavis Said?
Amruta Fadnavis : उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांचं उत्तर, “राजकारणात आज शत्रू असणारा उद्या मित्र..”
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश कार्याध्यक्ष
a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपवन येथे संस्कृती आर्ट फेस्टिवलचे आयोजन केले आहे. गेल्या ११ वर्षांपासून होत असलेल्या या फेस्टीवलसाठी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना सरनाईक यांनी आमंत्रण दिले होते. ते स्विकारत आव्हाड यांनी रविवारी या फेस्टिवलला उपस्थिती लावली. यानिमित्ताने मैत्रीत वितृष्ट आल्याने पंधरा ते सोळा वर्षांपुर्वी एकमेकांपासून दुरावलेले राज्याचे विद्यमान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे दोघे मित्र एकाच व्यापसीठावर आल्याचे दिसून आले. या व्यासपीठावरून उपस्थितांशी संवाद साधताना आव्हाड आणि सरनाईक या दोघांनी जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांची स्तुती केली.

आणखी वाचा-कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ५०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त

‘मी आणि जितेंद्र असे आम्ही दोघे लहानपणापासून मित्र आहोत. विद्यार्थी संघटनेपासून आम्ही एकत्र काम केले. आज जितेंद्र आव्हाड माजी मंत्री आहेत आणि मी आजी मंत्री आहे. भविष्यात ते आजी मंत्री होवोत, अशी अपेक्षा करतो’, अशा शुभेच्छा सरनाईक यांनी आव्हाड यांना दिल्या. तर, आव्हाड यांनीही सरनाईक यांचे कौतुक करत त्यांना मित्रत्वाचा मौलिक सल्ला यावेळी दिला. ‘गेली ३५ वर्षे मी आणि सरनाईक एकत्र आहोत. कधी लांब गेलो. कधी जवळ आलो. लांब मात्र एकदाच गेलो पण, जवळ मात्र कायम राहिलो. त्याचे कारण म्हणजे आमची माऊली (प्रताप सरनाईक यांची पत्नी परिषा सरनाईक) आहे. सरनाईक आणि माझे संभाषण दररोज सकाळी ७ ते ७.३० यावेळेत होत आहे. सरनाईक हे खूप संघर्ष करून मोठे झाले आहेत. कष्टाने जेव्हा यश मिळते ना, तेव्हा यशाची किंमत कळते. कर्तुत्वाने आणि कष्टाने लखलखाट होतो, तो पाहताना आनंद होतो. त्यामुळेच सरनाईक यांना मंत्री पद मिळाले, ही माझ्यासाठी आनंददायी बाब आहे. त्यांच्या कष्टाचे चीज झाले‘, असे सरनाईक म्हणाले.

आणखी वाचा-कल्याण : रस्त्यावरील किराणा सामान हटविण्यास सांगितले म्हणून दुकानदाराची मारहाण

सरनाईक हे परिवहन मंत्री आहेत. त्यामुळे एक सांगतो की, त्यांच्या काळात एसटीत खूप बदल होईल आणि ते दररोज बातमीत असतील. एसटी ही राज्याची लाईफलाईन आहे. जिथे कोणी पोहचत नाही, सुर्य पोहचू शकत नाही, तिथे एसटी पोहचतेय. गरिबाच्या आयुष्यात बदल घडवायचा असेल तर एसटीला ताकद द्यावी. पोरांची शाळा, शेतकऱ्यांसाठी एसटी महत्वाची आहे. त्यामुळे शिकणारी पोर आणि ताकदवान शेतकरी ही राज्याची गरज आहे. ती सरनाईक शंभर टक्के पुर्ण करतील. तुझे काम असेच प्रगतीपथकावर राहो. सगळ्यापेक्षा वेगळ्या कामाने चमकावे, अशी अपेक्षा आहे. असेही ते म्हणाले. इथे सगळ्यांच्या दृष्टीने तू वेगळा पद्धतीने चमकावे एवढीच इच्छा व्यक्त करतो, नाहीतर लोक आजकाल चमकतात. भ्रष्टाचार बाहेर येतात काही जणांच्या ऑर्डरला स्टे ऑर्डर मिळत आहे. त्या वादात तू पडू नकोस. तू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा मार्ग सरळ करून ठेव की, सगळे व्यवस्थित होईल, असा मैत्रीत्वाचा सल्ला आव्हाड यांनी दिला.

Story img Loader