जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस कळवा-मुंब्रा मतदारसंघ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिवसेना-भाजपचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्य़ामध्ये एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तोडीस तोड ताकद निर्माण केली. मात्र, गेल्या पाच वर्षांत गणेश नाईक, किसन कथोरे आणि कपिल पाटील या बडय़ा नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यामुळे जिल्ह्य़ातील पक्षाची अवस्था बिकट असल्याचे चित्र आहे. या धक्क्य़ातून पक्ष कधी सावरेल आणि जिल्ह्य़ात पुन्हा मुसंडी मारेल का या सर्व प्रश्नांची उत्तरे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ‘लोकसत्ता ठाणे’ला दिलेल्या मुलाखतीत दिली. ‘नेते गेले असले तरी कार्यकर्ते पुन्हा पक्षाला उभारी देतील,’ असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

गणेश नाईक, किसन कथोरे आणि कपिल पाटील असे नेते राष्ट्रवादीला सोडून गेल्याने ठाणे जिल्ह्यत राष्ट्रवादीची अवस्था बिकट झाली आहे..?

स्वार्थी राजकारणी आयत्यावेळेस दगा देतात. त्याचा प्रत्यय ठाणे जिल्ह्य़ातही आला आहे. पण,  कोणी गेल्याने पक्ष खिळखिळा होत नाही. काही काळानंतर पक्ष पुन्हा उभारी घेतो. कार्यकर्त्यांच्या जीवावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही अशाच प्रकारे उभारी घेईल. नेते सोडून गेल्यानंतर कायकर्तेही काही क्षणापुरते सैरभैर होतात. परंतु काही वेळानंतर खंबीर होऊन ते पुन्हा पक्ष वाढवतात.

तुमच्या पक्षाचे धोरण काय आहे?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून होणारी भरती प्रक्रिया रोखली गेली आहे. नोकरी हा प्रमुख प्रश्न असून तो प्रामुख्याने सोडविला गेला पाहिजे. एक लाख पोलीस भरती केले पाहिजेत. मात्र, सरकारने ही भरतीच केलेली नाही. जिल्ह्य़ात धरण बांधणे आणि त्या माध्यमातून ठाणे शहर नव्हे तर जिल्ह्य़ाचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे.  दुर्दैवाने २५ वर्षे ज्यांच्या हातात महापालिकेची सत्ता आहे. त्यांना काहीच पडलेले नाही.

विरोधी पक्ष म्हणून तुमचा पक्ष अनेक मुद्दे आR मकपणे मांडतो. मात्र, हीच भूमिका ठाणे-कळव्यापलीकडे का दिसून येत नाही..

पक्षाचा एखादा नेता आक्रमकपणाने बोलतो. मात्र, सर्वच कार्यकर्ते आक्रमक भूमिका मांडू लागले तर अराजकता माजेल. नेता हा पक्षाचा चेहरा असतो आणि तोच आक्रमकपणे भूमिका मांडत असतो. तीच भूमिका पक्षाची भूमिका असते.

अनेक ठिकाणी तुमच्या पक्षाने मनसेला पाठिंबा दिला आहे. मग जाहीर आघाडी का नाही?

अजिबात असे नाही. तो व्यूहरचनात्मक समजूतदारपणा आहे. आगामी काळात महापालिका निवडणुकांना सामोरे जाताना काय आव्हाने असतील. पक्षाचा विस्तार कसा करता येईल. याचा विचार करणे गरजेचे आहे. त्याप्रमाणे ‘व्यूहात्मक’ आघाडी करायला हवी. तेच ठाण्यामध्ये केले आहे.

  मनसेसोबतची आघाडी पालिका निवडणुकीतही दिसेल का आणि त्याचा जिल्ह्य़ाच्या राजकारणावर काही फरक पडेल का?

भविष्याच्या दृष्टीने पावले टाकावीत म्हणून हात पुढे केला आहे. पण मी काही ज्योतिषी नाही. हुकुमशाहीच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. यासाठी जे जे करता येईल, ते आम्ही केले.

राष्ट्रवादीत भुजबळ विरुद्ध अजित पवार नवा संघर्ष निर्माण झालाय त्याबद्दल काय वाटते ?

छगन भुजबळ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून त्यांना पक्षाचे नेते अजित पवार हे सुद्धा मानतात. या दोन्ही नेत्यांमध्ये संघर्ष सुरू नाही. स्पष्टवक्तता दिसली तर तुम्हाला संघर्ष असल्यासारखे वाटते. प्रत्यक्षात मात्र असा काहीच संघर्ष नाही.