अजित पवार यांच्या महायुतीत येण्यासंदर्भात बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांचा उल्लेख ‘म्हातारा’ असा केला होता. मुलगा कर्तबगार झाला की बाप त्याच्या हाती प्रपंच देतो आणि गप्प बसतो. पण हे म्हातारं लय खडूस. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतंय, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली होती. या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ठाण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

“या लोकांनी शरद पवार यांचं घर फोडलं आहे. त्यांच्या घरात चोरी केली आहे. खरं तर लटकवलेली चावी जो नेतो, तो पकिटमार असतो. त्यामुळे हे लोक पाकीटमार आहेत. ट्रेन मधून जाताना घड्याळ चोरतो, तो पाकीटमार असतो. मुळात हे लोकच दरोडेखोर आहेत”, असं प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी दिले.

हेही वाचा – पिंपरी : मावळमध्ये ‘या’ वाघेरेंचा अर्ज बाद…

सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले होते?

दरम्यान, दाभाऊ खोत यांनी रणजीतसिंह निंबाळकरांच्या प्रचारात शरद पवारांचा उल्लेख म्हातारा असा केला होता. “लोकसभेची लढाई ही वाडा विरुद्ध गावगाडा म्हणजेच प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी आहे. मतदारसंघात शरद पवारांबाबत अनेक गोष्टी ऐकू येतील. शरद पवारांचं वय ८४ आहे म्हणून ते ८४ सभा घेणार अशाही चर्चा सुरु आहे. पण मला सांगा शरद पवारांना काय काम आहे? त्यांना म्हशी वळायच्या आहेत की जनावरांना पाणी पाजायचं आहे. या वयातही आमच्यासारख्यांना ते संधी देत नाहीत.” अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली होती.

हेही वाचा – संजय राऊत यांचं वक्तव्य, “एकनाथ शिंदे लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणातच राहणार नाहीत”

“मुलगा कर्तबगार झाला की बाप त्याच्या हाती प्रपंच देतो आणि गप्प बसतो. पण हे म्हातारं लय खडूस. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडतंय. अजित पवार किल्ली बघून बघून म्हातारे झाले. मग अजित पवारांच्या लक्षात आलं की म्हातारं काही कंबरेची किल्ली काढत नाही, म्हणून दादा किल्लीला लोंबकळत म्हणतोय किल्ली तोडल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला प्रपंच करु द्या, आम्ही प्रपंच म्हातारं झाल्यावर करायचा का? हे म्हणत विकासासाठी अजित पवार महायुतीत आले”, असेही ते म्हणाले होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad replied to sadabhau khot over comment on sharad pawar age rno news spb