Jitendra Awhad on Chhatrapati Shivaji Maharaj Temple in Mumbra : आमची सत्ता आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. फडणवीस म्हणाले, “तुम्ही म्हणता सगळीकडे मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार, चला तर मग आपण मुंब्र्याला शिवाजी महाराजांचं मंदिर उभारू, तुम्हाला मदत करायला आम्ही तयार आहोत. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पहिलं मंदिर तिथे उभारु आणि छत्रपती शिवरायांना नमन करू.” फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना हे खुलं आव्हान दिल्यानंतर यावर आता महाविकास आघाडीचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे. आव्हाड म्हणाले, “मला शासनाची परवानगी व जागा द्या, मी मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधतो आणि तिथे उद्धव ठाकरेंना उद्घाटनाला बोलावतो.
Jitendra Awhad : “…मग मुनगंटीवार का पडले?” व्होट जिहादच्या दाव्यांवरून आव्हाडांचा फडणवीसांना खोचक प्रश्न
Jitendra Awhad on Shivaji Maharaj Temple : देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या आव्हानाला जितेंद्र आव्हाडांचं उत्तर.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-11-2024 at 16:51 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSजितेंद्र आव्हाडJitendra Awhadदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024विधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad says if govt gives land and permission will build shivaji maharaj temple in mumbra asc