विवियना माॅल येथे प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह १२ जणांना शुक्रवारी ठाणे पोलिसांनी अटक केली होती. अटकेपूर्वी पोलीसांनी त्यांच्या गुन्ह्यामध्ये कलम ७ हे देखील लागू केले आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांना न्यायालयात हजर केले असता, आव्हाड यांच्या वकिलांनी ही अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तीवाद केला. तर पोलिसांनी आव्हाड सहकार्य करत नसल्याचे म्हटले होते.

हेही वाचा- जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर ठाण्यात तणाव, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Nagpur bench of Bombay High Court grants bail to one accused in four-year-old boy kidnapping case
न्यायालय म्हणाले,‘आरोपीच्या हक्कांचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य’…
youth dies by suicide
प्रेयसीशी व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणानं केली आत्महत्या
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
thane police
कल्याणमध्ये तळीरामांची पोलीस उपायुक्तांकडून खरडपट्टी

ठाण्यातील विवियाना माॅल येथे हर हर महादेव या चित्रपटाचा खेळ सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बंद पाडला होता. या घटनेदरम्यान, एका प्रेक्षकाला धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते. त्यानंतर प्रेक्षकाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे आव्हाड यांच्यासह १०० जणांविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच, शुक्रवारी वर्तकनगर पोलिसांनी आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह १२ जणांना अटक केली. आव्हाड यांच्या अटकेचे वृत्त कळताच, ठाणे, कळवा, मुंब्रा भागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याच्या जमण्यास सुरूवात केली होती. रात्रभर हे कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या बाहेर ठाणं मांडून होते.

हेही वाचा- जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामांना वेळीच आवर घालावा; लोकप्रतिनिधींची ठाण्याच्या पालकमंत्र्यांकडे मागणी

आव्हाड यांना शनिवारी सकाळी १०.३० वाजता पुन्हा ठाणे न्यायालयात आणण्यात येणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांना मिळताच पुन्हा न्यायालयाबाहेर कार्यकर्ते जमण्यास सुरूवात केली होती. आव्हाड यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी न्यायालयाबाहेरील आवारात चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच न्यायालयासमोरील दोन्ही दिशेकडील रस्ता बंद करण्यात आला होता.

सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास आव्हाड यांना न्यायालयात आणण्यात आले. त्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. एल. पाल यांच्या न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. राजकीयदृष्ट्या रंजक असलेल्या या प्रकरणाची सुनावणी एेकण्यासाठी मोठ्याप्रमाणात वकील उपस्थित होते. सरकारी पक्षातर्फे पोलिसांनी सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी यावेळी केली. त्यास आव्हाड यांच्या वकिलांनी यावर आक्षेप घेत ही अटक बेकायदेशीरपणे आहे. तसेच नोटीस दिल्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी १२ जणांना अटक केली. तसेच पोलिसांनी लावलेले वाढीव कलमही लागू होत नसल्याचे आव्हाड यांच्या वकिलांनी युक्तीवादात म्हटले. तर आव्हाड यांच्यासह १२ जणांची कोठडी ही पुढील तपासासाठी महत्त्वाची असल्याचे सरकारी पक्षातर्फे सांगण्यात आले.

हेही वाचा- मीरा भाईंदर नाट्यगृहातील पहिला प्रयोग रद्द; नाट्यगृहात त्रुटी असल्याचा निर्मात्यांचा आरोप

न्यायालय परिसरात आव्हाडांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. आव्हाड न्यायालयाबाहेर पडताना त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर आव्हाड समर्थक पुन्हा वर्तकनगर येथे गेले. तिथे त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Story img Loader